Connect with us

सिंधुदुर्ग

‘कुडाळेश्वर’च्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला आज पासून सुरुवात

Published

on

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ (कुडाळ) च्या वतीने कै.ॲड.अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन आज गुरूवार दि.७ ते गुरुवार दि.१४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत श्री देव कुडाळेश्वर मंदीर येथे रात्री ८ वा. आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा. प.पू.श्री राऊळ महाराज प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी)च्या भजनाने स्पर्धेची सुरवात होईल. ९ वा. समर्थ प्रा.भजन मंडळ (कट्टा),

शुक्रवार दि. ८ रोजी रात्री ८ वा. खरावतेवाडी प्रा. भजन मंडळ (तेंडोली), ९ वा. दत्तकृपा प्रा.भजन मंडळ (वैभववाडी),

शनिवार दि. ९ रोजी रात्री ८ वा. महापुरूष प्रा.भजन मंडळ (मळगाव), ९ वा. रामेश्वर प्रा.भजन मंडळ (तळगाव),

रविवार दि.१० रोजी गिरोबा प्रा.भजन मंडळ (बिबवणे), ९ वा. श्री देव भोम प्रा.भजन मंडळ (आंदुर्ले),

सोमवार दि.११ रोजी सायं.७ वा. अभंग महीला प्रा. भजन मंडळ (कुडाळ), रात्री ८ वा. लक्ष्मी प्राथमिक शिक्षक प्रा.भजन मंडळ (माणगांव), ९ वा. ब्राम्हणदेव प्रा.भजन मंडळ (पडवे),

मंगळवार दि.१२ रोजी रात्री ८ वा. स्वराभिषेक प्रा.भजन मंडळ (मणेरी), ९ वा. प्राथमिक शिक्षक कला मंच (कुडाळ),

बुधवार दि.१३ रोजी रात्री ८ वा. दत्तगुरू प्रा.भजन मंडळ (वैभववाडी), ९ वा. महापुरूष प्रा. भजन मंडळ (पिंगुळी),

गुरुवार दि.१४ रोजी रात्री ८ वा. महापुरूष प्रा.भजन मंडळ (अणाव) व ९ वा. स्वरधारा प्रा.भजन मंडळ (तांबोळी) यांची स्पर्धेची भजने होणार आहेत.