Connect with us

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात चालक पोलीस शिपाई पदांसाठी 13 ऑक्टोबरला लेखी परीक्षा

Published

on

[ad_1]

जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 20 चालक पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी 13 ऑक्टोबर रोजी कुडाळमधील संत राऊळ महाराज विद्यालय, कुडाळ हायस्कूल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज, एमआयडीसी या परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस उपअधिक्षक एस.बी.गावडे यांनी दिली.

या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र ( Hall ticket) उमेदवारांच्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.

उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या परीक्षाकेंद्रांवर ओळखपत्रासह (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना इ.) वेळेत उपस्थित रहावे.

उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी 18002100309 (सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत) bhartimahapolice@gmail.com, पोलीस भरती मदत केंद्र, 02362- 228008 व पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228614 या वर संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Advertisement
Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2021 Kokanshakti. Theme by MVP Themes, powered by WordPress.