पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १.५ कोटी लसीकरणाचा विक्रम
[ad_1]
नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी आज एकाच दिवसात देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा 1 कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आले आहे.
भारताने कोरोना लसीकरण मोहीमेत आज नवा रेकॉर्ड बनवला आहे. देशात आज (17 सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला आहे. या अगोदर 27 ऑगस्टला 1.03 कोटी नागरिकांना डोस देण्यात आले. 31 ऑगस्टला 1.33 कोटी नागरिकांना डोस देण्यात आला. 6 सप्टेंबर 1.13 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आज 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दोन कोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य आहे.
𝟏.𝟓𝟎 𝐜𝐫𝐨𝐫𝐞 𝐯𝐚𝐜𝐜𝐢𝐧𝐞 𝐝𝐨𝐬𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐬𝐭𝐢𝐥𝐥 𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠, 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐬𝐞𝐭𝐬 𝐚 𝐧𝐞𝐰 #𝐂𝐎𝐕𝐈𝐃𝟏𝟗 𝐯𝐚𝐜𝐜𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐫𝐞𝐜𝐨𝐫𝐝.#LargestVaccineDrive #We4Vaccine pic.twitter.com/vxSh1PIGjP
— PIB India (@PIB_India) September 17, 2021
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल.शुक्रवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 34,403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 320 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 37, 950 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतातील कोरोनाची स्थिती
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 33 लाख 81 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 44 हजार 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 98 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. तर एकूण 3 लाख 42 हजार 923 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
[ad_2]
Post Comment