Connect with us

देश

पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत बदलले काही जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या सविस्तर

Published

on

[ad_1]

Petrol Diesel Rate on 14th August 2023: देशातील तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज सकाळी 6 वाजता अपडेट करण्यात आले आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. नवी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.

तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

कच्च्या तेलाचे दर काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण पाहायला मिळत आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत 0.34 टक्क्यांनी घसरून 82.91 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 0.33 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 86.47 डॉलरवर आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर?

  • पुण्यात पेट्रोलचे दर 106.17 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर आहे.
  • नाशकात पेट्रोलचे दर 106.54 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर
  • अहमदनगरमध्ये एक लिटर पेट्रोल 105.96 रुपये, तर एक लिटर डिझेल 92.49 रुपयांना
  • सिंधुदुर्गात पेट्रोलची किंमत 108.01 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.48 रुपये प्रति लिटर
  • सोलापुरात एक लिटर पेट्रोल 106.77 रुपयांना, तर एक लिटर डिझेल 93.29 रुपयांना
  • कोल्हापुरात एक लिटर पेट्रोल 106.56 रुपये प्रति लिटर, तर एक लिटर डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  • नागपुरात पेट्रोल 106.28 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर
  • गडचिरोलीत 106.92 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल 93.45 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *