डिझेल कडाडलं, तब्बल 70 दिवसांनी दरांत वाढ, नव्या किमतींनुसार एका लिटरसाठी किती पैसे?

[ad_1]

Petrol and Diesel Price in India Latest Updates : देशात डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ (Diesel Price Hike) झाली आहे. शुक्रवार म्हणजेच, 24 सप्टेंबर 2021 रोजी दोन महिन्यांहून अधिक काळानं देशात डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आज ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, डिझेलच्या किमतीत 20 ते 22 पैशांची वाढ करण्यात आली आहे. अशातच पेट्रोलचे दर (Petrol Price) मात्र स्थिर आहेत. मुंबईत डिझेलची किंमत दरवाढीनंतर 96.19 रुपये प्रति लिटरवरुन 96.41 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत डिझेल 88.62 रुपये प्रति लिटरवरुन 88.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

दरम्यान, यापूर्वी 15 जुलै 2021 रोजी डिझेलच्या दरांत वाढ झाली होती. तेव्हा पेट्रोल 15 पैशांनी महागलं होतं. परंतु, त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ झालेली नव्हती. तसेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंधनाच्या दरांत काही प्रमाणात घट झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. देशाच्या राजधानीच्या शहरात पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 101.62 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 91.92 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमती 98.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 93.46 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशातील चार महानगरांची तुलना केली, तर पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत.

देशातील प्रमुख शहरांतील दर :

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का? यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं…

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल.

सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे.

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

[ad_2]

Related Posts

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

तळेगाव दाभाडेजवळील कुंडमळा परिसरात, 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास, इंद्रायणी नदीवर असलेला एक जुना लोखंडी पादचारी पूल कोसळला. पूल कोसळण्याच्या वेळी त्यावर 50 ते 125 लोक उपस्थित…

Continue reading
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

अहमदाबाद – Ahmedabad Plane Crash News अंतर्गत आलेल्या धक्कादायक घटनेत बांसवाडा येथील व्यास कुटुंबातील पाच जणांचा जीव गेला आहे. एअर इंडियाच्या AI-171 या फ्लाईटने अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

  • By Editor
  • June 15, 2025
  • 5 views
🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

  • By Editor
  • June 13, 2025
  • 12 views
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

  • By Editor
  • June 12, 2025
  • 13 views
एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?

  • By Editor
  • June 12, 2025
  • 16 views
IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?

Papaya Benefits | आरोग्याचा खजिना – Papaya (पपई)

  • By Editor
  • June 10, 2025
  • 24 views
Papaya Benefits | आरोग्याचा खजिना – Papaya (पपई)

मुंबई–कोंकण प्रवास आता फक्त ४ ते ५ तासात! ‘रेवास–रेड्डी कॉस्टल हायवे’ बनेल कोंकणातील खेळ बदलणारा प्रकल्प 🚀

  • By Editor
  • June 8, 2025
  • 55 views
मुंबई–कोंकण प्रवास आता फक्त ४ ते ५ तासात! ‘रेवास–रेड्डी कॉस्टल हायवे’ बनेल कोंकणातील खेळ बदलणारा प्रकल्प 🚀