Connect with us

क्रिडा

माजी क्रिकेटरचे खडे बोल, म्हणाला विराटने हट्टा पाई त्या दोन खेळाडूंना बाहेर ठेवले

Published

on

टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने भारतीय संघाचा १० गडी राखून पराभव केला. त्यामुळे अनेकांनी या सामन्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

आता एका माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनला पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचे कारण मानले आहे. तसेच खराब फॉर्मशी झुंज देत असतानाही कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याला संघात समाविष्ट करण्याच्या निर्णयावरही माजी क्रिकेटपटूने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगनेही हार्दिकचा पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरवणे ही विराटची सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. महामुकाबेलमध्ये पांड्याची कामगिरी विशेष नव्हती आणि त्याच्या खांद्यालाही दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्याऐवजी दुसऱ्याला संधी द्यायची होती, असे हॉगने म्हटले आहे.

त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हॉग म्हणाला, ‘मला वाटतं हार्दिक पांड्याला खेळायला देणं ही सर्वात मोठी चूक होती’. पाकिस्तानविरुद्ध पांड्याने ८ चेंडूत ११ धावा केल्या होत्या आणि तो अजिबात लयीत दिसला नाही. फलंदाजीदरम्यान त्याच्या खांद्यालाही दुखापत झाली, त्यामुळे तो मैदानात उतरूही शकला नाही.

भारतीय संघातील मुख्य गोलंदाजांना धमाकेदार कामगिरी करता आली नाही, त्यामुळे गोलंदाजाची कमतरता स्पष्टपणे जाणवत होती. हार्दिकची बॅट बर्‍याच दिवसांपासून शांत आहे आणि तो बरेच दिवस गोलंदाजीही करत नाहीये. आयपीएल २०२१ च्या सिजनमध्येही टीम इंडियाच्या या अष्टपैलू खेळाडूने एकही अर्धशतक झळकावले नाही किंवा एकही ओव्हर टाकली नाही.

विराटने त्याच्याऐवजी शार्दुल किंवा अश्विनला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले असते. तसेच शमीच्या जागी शार्दुलला आणि पांड्याच्या जागी अश्विनला संघात आणण्याचा पर्याय कोहलीकडे होता, असेही हॉगने आपल्या युट्युब व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अशावेळी तुमच्याकडे जडेजा ६व्या क्रमांकावर, शार्दुल ७ व्या क्रमांकावर आणि अश्विन ८व्या क्रमांकावर असेल. पांड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवायचे असेल तर त्याला गोलंदाजी करावी लागेल. त्याच्याकडे भरपूर प्रतिभा आहे, पण त्याने खेळात उत्तम कामगिरी करणे गरजेचे आहे, असेही हॉगने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.