×

१०  विरुद्ध ०७ मतांनी विजय संपादन करून शितल आंगचेकर बनल्या वेंगुरला नगर परिषदेच्या नूतन उपनगराध्यक्ष

१०  विरुद्ध ०७ मतांनी विजय संपादन करून शितल आंगचेकर बनल्या वेंगुरला नगर परिषदेच्या नूतन उपनगराध्यक्ष

[ad_1]

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी नगरपरिषदेच्या विशेष सभेत हात वर करून घेण्यात आली पोटनिवडणूक. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होतेय उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व ऑफलाईन घेण्यात आली विशेष सभा.

दरम्यान यावेळी न.प. च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, नगरसेवक तुषार सापळे, विधाता सावंत, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, शैलेश गावडे, नगरसेविका शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, अस्मिता राऊळ, पूनम जाधव, कृतिका कुबल, कृपा गिरप मोंडकर, स्नेहल खोबरेकर, सुमन निकम, स्विकृत नगरसेवक संदेश निकम, दादा सोकटे आदी उपस्थित होते, तर नगरसेवक नागेश गावडे होते ऑनलाईन उपस्थित.

यावेळी काँग्रेसचे विधाता सावंत व शितल आंगचेकर यांच्यासाठी हात वर करून घेण्यात आली निवडणूक यात विधाता सावंत याना ७ मते तर शितल आंगचेकर यांना १० मते नगरसेवक तुषार सापळे राहिले तटस्थ यामुळे शितल आंगचेकर यांना विजय होऊन त्या नुतन उपनगराध्यक्ष पदी विराजमान.

[ad_2]

Post Comment