Connect with us

क्रिडा

ऋतुराजचा नाद खुळा, आयपीएलमध्ये अशा पद्धतीने शतक पूर्ण करणारा ठरला एकमेव खेळाडू

Published

on

[ad_1]

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना खेळला गेला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दमदार शतक झळकावले आणि निर्धारित २० षटकात १८९ धावा केल्या. आपल्या खेळी दरम्यान ऋतुराजने अनोख्या पद्धतीने शतक पूर्ण केले.

ऋतुराज ९५ धावांवर असताना त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून शतक पूर्ण करणारा ऋतुराज एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच डावाच्या अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण करणारा तो एकूण चौथा खेळाडू आहे.

याआधी २०११ आणि २०१५ साली अनुक्रमे सचिन तेंडुलकरने कोची टस्कर केरला आणि ब्रॅंडम मॅक्यूलमने हैदराबादविरुद्ध शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेत आपले शतक पूर्ण केले होते. याशिवाय विराट कोहलीने २०१६ साली गुजरात लॉयन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले होते.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने ४७ धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला फार विशेष कामगिरी करता आली नाही. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाडने एका बाजूने खेळपट्टीवर उभा राहिला.

हे पण वाचा: सीएसकेविरुद्ध १९ चेंडूत तूफानी अर्धशतक झाळकवणाऱ्या यशस्वीला धोनीकडून ‘ग्रेटभेट’

अखेरच्या काही षटकांमध्ये त्याला रवींद्र जाडेजाने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी रचली.  ऋतुराज शेवटपर्यंत नाबाद राहिला. या दरम्यान त्याने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने ६० चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली.

प्रतिउत्तरदाखल, राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि एव्हिन लुईसने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. ५.२ षटकांमध्ये दोघांनी ७७ धावांची सलामी दिली. लुईस २७ धावांवर बाद झाल्यानंतरही यशस्वी जयस्वाल फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅमसनने २८ धावांची उपयुक्त खेळी केली. जयस्वाल बाद झाल्यानंतर शिवम दुबेने जोरदार फटकेबाजी केली. दुबेने ४२ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. दुबेने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. या खेळींच्या जोरावर राजस्थाने ७ गडी आणि १५ चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पार केले.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *