RBI MPC Meeting Today : मोठी बातमी; रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये बदल झाला का?

[ad_1]
नवी दिल्ली : आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळीदेखील आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम असेल. गुरुवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले.

शक्तिकांत दास यांनी दिले होते संकेत

याआधी गेल्या महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटच्या दरावर भाष्य केलं होतं. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि महागाई दर लक्षात घेता व्याज दरात कपात करण्याबाबात सध्याच निर्णय घेणे थोडे घाईचे ठरेल. भारतासह सध्या संपूर्ण जगात आर्थिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीबाबत सध्याच चर्चा करणे योग्य नाही. आरबीआयने महागाई दर चार टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. तर प्रत्यक्ष मात्र महागाई दर 5 टक्क्यांपेक्षा पुढे गेलेला आहे, असे तेव्हा शक्तिकांत दास म्हणाले होते.

सलग आठव्यांदा रेपो रेट जैसे थे

आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची प्रती दोन महिन्यांनी आयोजित केली जाणारी चलनविषक धोरण ठरवणारी तिसरी बैठक पार पडली. 6 ते 8  ऑगस्ट या कालावधीत ही बैठक झाली. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखील एकूण सहा सदस्य असलेल्या बैठकीत रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

तुमच्या कर्जाच्या हप्त्यात काय बदल?

रेपो रेटमध्ये बदल झाल्यास तुमच्या घर, वाहन तसेच अन्य कर्जाच्या हप्त्यांत बदल होतो. यावेळी आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्यांत वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाही.

हेही वाचा :

Mazi Ladki Bahin Yojana List 2024: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, नाव कसं दिसणार?

[ad_2]

Related Posts

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

तळेगाव दाभाडेजवळील कुंडमळा परिसरात, 15 जून 2025 रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास, इंद्रायणी नदीवर असलेला एक जुना लोखंडी पादचारी पूल कोसळला. पूल कोसळण्याच्या वेळी त्यावर 50 ते 125 लोक उपस्थित…

Continue reading
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

अहमदाबाद – Ahmedabad Plane Crash News अंतर्गत आलेल्या धक्कादायक घटनेत बांसवाडा येथील व्यास कुटुंबातील पाच जणांचा जीव गेला आहे. एअर इंडियाच्या AI-171 या फ्लाईटने अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

  • By Editor
  • June 20, 2025
  • 46 views
🔥 “एक गोणी खताची किंमत ₹1350 असताना शेतकऱ्यांकडून ₹1600 पर्यंत वसुली!”

🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

  • By Editor
  • June 18, 2025
  • 19 views
🌧️ पावसाळ्यातील त्वचेची काळजी: नैसर्गिक उपाय आणि टिप्स

🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

  • By Editor
  • June 15, 2025
  • 17 views
🛑 पुण्यात पूल कोसळला, अनेक जण वाहून गेले

Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

  • By Editor
  • June 13, 2025
  • 30 views
Ahmedabad Plane Crash News: अहमदाबाद विमान अपघातात एका संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

  • By Editor
  • June 12, 2025
  • 25 views
एअर इंडियाचे लंडनकडे जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले; २४२ जण होते प्रवासात

IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?

  • By Editor
  • June 12, 2025
  • 26 views
IPLचा ‘Lucky Charm कोण आहे माहितीय का?