रसाळगड किल्ल्याला येणार पूर्वीचे दिवस
[ad_1]
खेड (प्रतिनिधी) :छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा खेड तालुक्यातील रसाळगड किल्ल्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या किल्ल्यावरील अत्यावश्यक जतन दुरुस्ती कामांसाठी लागणारे १४ कोटी १६ लाख २१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक पुरातत्त्व विभागाने शासनाला सादर केले असून लवकरच या अंदाजपत्रकाला शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय मंजुरी मिळणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिली.
मागील टप्प्यातील रसाळगड किल्ल्यावर अनेक कामे अपूर्ण आहेत. नवीन अंदाजपत्रकात किल्ल्यातील झाडे झुडपे काढणे, तटबंदी, धान्यकोठार, बालेकिल्ला इत्यादी वास्तूंची दुरुस्ती तसेच पर्यटकांकरिता विशेष सोयीसुविधा या प्रमुख बाबींचा समावेश आहे.
रसाळगड किल्ल्यावरील मागील टप्प्यातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे व पर्यटकांकरिता आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करणे यासाठी घेरारसाळगड गावचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे मागील अनेक वर्षे शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे. वरील पुरातत्त्व विभागाने प्रस्तावित केलेली कामे प्रत्यक्षात जेव्हा मार्गी लागतील तेव्हा किल्ले रसाळगडचे पर्यटन दृष्टीने महत्त्व वाढणार आहे.
[ad_2]
Post Comment