Connect with us

विश्व

PM Modi : नरेंद्र मोदींना इस्रायलच्या पंतप्रधानांची ऑफर, म्हणाले आमच्या पक्षात या…

Published

on

PM Modi Meets Naftali Bennett : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ग्लासगो, जलवायू शिखर सम्मेलनावेळी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची   ही पहिलीच भेट होती. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. नफ्ताली बेनेट यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं तौंडभरुन कौतुक केलं. आपण इस्रायलमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहात, असेही मोदींना सांगितलं. पंतप्रधान बेनेट यांनी गंमतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. 

नरेंद्र मोदी आणि नफ्ताली बेनेट यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधावरही चर्चा झाली. उच्च-तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नफ्ताली बेनेट यांना भारत दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे.

उभय नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषत: उच्च-तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या  क्षेत्रात सहकार्य आणखी व्यापक करण्यावर  त्यांनी सहमती दर्शवली. पुढील वर्षी भारत आणि इस्रायल यांच्यातील संपूर्ण राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 30 वर्षे पूर्ण होतील याचे स्मरण करून देत पंतप्रधानांनी बेनेट यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.

बेनेट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत बेनेट मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत. आपण इस्रायलमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहात, असं बेनेट यांनी सांगिल्यानंतर मोदी यांनी  “धन्यवाद, धन्यवाद.” म्हटलं. त्यानंतर बेनेट यांनी मोदींना त्यांच्या  त्यांच्या यामिना पक्षात सामील होण्यास सांगितले. यावर दोन्ही नेत्यांनी हसत-हसत हस्तांदोलन केले.  

मोदी यांनीही ट्विट करत बेनेट यांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी रोम आणि ग्लासगोमधील आपला पाच दिवसीय दौरा पूर्ण केल्यानंतर भारतासाठी रवाना झाले आहेत, त्यावेळी त्यांना एक ट्वीट केलं. त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी रोममध्ये जी-20 शिखर सम्मेलनात सहभाग घेतला होता. तर ग्लासगोमध्ये सीओपी-26 जलवायू शिखर सम्मेलनात सहभागी झाले होते.