Connect with us

ब्लॉग

१७ अशा मोटारसायकल्स ज्यांची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसावी!

Published

on

French-Majestic-1930-Pinterest

१९८५ ते १९५० च्या दरम्यानच्या काही खतरनाक मोटारसायकल डिझाईन्स ज्या बद्दल तुम्ही कल्पना देखील केली नसेल. खूप लोकांना असं वाटत की मोटोरसायकल्स १९५० आणि ६० च्या नंतर प्रकाशझोतात आल्या. पण प्रत्यक्षात इतिहासाचा शोध घेतल्यास असं निदर्शनास आलाय की ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री १८ व्या शतकापासून आहे. काही मोटोरसायकल्स ह्या फोर्डच्या मॉडेल टी च्या आधी पासून आहेत.

सुरुवातीच्या काळात ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीतील डिज़ाइनर्स ज्या भन्नाट वेड्या सारख्या कल्पना घेऊन येत असत ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही अशाच काही भन्नाट मोटोरसायकल्सच्या डिझाइन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलोत, ते पाहून तुम्ही विचार कराल की खरंच त्याकाळातील डिज़ाइनर्स खरंच वेडे होते की kay?

ह्या पैकी बराचश्या डिजाइन्स ह्या जागतिक युद्धाच्या वेळी असस्तिवात आल्या. त्यातील बऱ्याचश्या मोटोरसायकल्स ह्या अल्पवयीन होत्या. त्यातील काही डिझाइन्सनि आताच्या आधुनिक मोटोरसायकल्स ना प्रेरणा दिली. १७ विचित्र मोटारसायकली अस्तित्वात असतील असा कधी तुम्ही विचार देखील केला नसेल आणि त्यातील मोटोरसायकल्स आजही चालविण्यासारखे आहेत.

१७ – मेगोला (Megola)

Megola

चित्र बघून झालात ना अचंबित? आहे ना खूप मजेदार अशी मोटरसायकल. हीच नाव आहे मेगोला. १९२० मध्ये फ्रित्झ कोकरेल यांनी ही मोटोरसायकल डिजाईन केली होती.

प्रत्यक्ष पाहता साधारणपाने हे २०व्या शतकातील आधुनिक मोटरसायकल सारखी साधारण दिसते. मुख्य म्हणजे ह्या बाईक मध्ये ५ सिलेंडर्स रेडियल इंजिन आहे आणि ते चाकाच्या वरती बसवलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला बाईक थांबवायची झाली तर पूर्ण इंजिन बंद केल्या शिवाय पर्याय नाही. परिणामी ही बाईक जास्त काळ चालली नाही.

१६ – नेर-अ-कार (Ner-A-Car)

Ner-A-Car

ह्या बाईकच नाव दुहेरी आहे. पाहिलं नाव हे त्याच्या डिझायनरच्या नावावरून ठेवलं आहे, कार्ल नेरशर आणि दुसरा म्हणजे जवळपास कार. कारण कार मध्ये जसे पाय स्टिअरिंगच्या खाली असतात अगदी तसाच आहे.

१५ – मॅजेस्टिक (Majestic)

Majestic

ह्या विमानासारख्या दिसणाऱ्या बाईकचे नाव आहे मॅजेस्टिक. जॉर्ज रॉय यांनी सन १९२९ या बाईकची निर्मिती केली. ५०० सीसी इंजिनची क्षमता असणारी ही बाईक चालवण्यासाठी तेवढी आरामदायी नसावी हे त्याच्या सीट आणि स्टिअरिंगच्या अंतरावरून लक्षात येते. विचित्र दिसणारी ही मोटरसायकल त्या काळच्या नाविन्यपूर्ण मोटारसायकल मध्ये गणली जाते.

१४ – इम्मे आर१०० ( Imme R100 )

Imme R100
mecumauctions.com

एखाद्या सायकलला मोटारसायकलच इंजिन लावल्यावर कसं दिसेल अगदी तशी इम्मे आर१०० वाटते. या मोटारसायकलची निर्मिती जर्मन संशोधक नॉर्बर्ट रेईडेल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर केली. रेईडेल यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यास खूप वेळ गेला कारण त्यांना युद्धासाठी लागणाऱ्या यंत्र आणि शस्त्र बनवायचं काम दिल होत. बाकीच्या मोटारसायकल बरोबर तुलना केली असता रेईडेल यांची ही संकल्पना उत्तम वाटते.

१३ – बोहर्मलँड ( Bohmerland )

 Bohmerland
via Flickr

ह्या हत्तीसारख्या दिसणाऱ्या मोटारसायकलची निर्मिती झेकोस्लोवाकियाच्या एका कंपनीने १९२४ साली केली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे कंपनी बंद झाली पण ही बाईक आजून आहे. त्यावेळी मोटरसायकल ह्या जास्त करून एका आसनाच्या असायच्या. कंपनीने ह्या मोटारसायकलला “पहिली फॅमिली मोटोरसायकल” म्हणून जाहिरात केली.

१२ – फिनिक्स ट्रीमो ( Phoenix Trimo)

Phoenix Trimo
via yesterdays.com

हि काही भ्रमात टाकणारी इमेज नाही किंवा काही चुकीची बनावट नाहीय. arthat १९०० दशकातील एक प्रसिद्ध मोटोरसायकल होती आणि तिचा उपयोग श्रीमंत लोक गाजावाजा करण्यासाठी वापरत.

११ – वेलबाईक ( Welbike )

Welbike
via bike-urious.com

वेलबाईक युद्धामध्ये वापरण्यासाठी बनवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी जवळच्या जवळ दळण-वळणासाठी ह्या मोटोरसायकलचा वापर केला जायचा. युद्धाच्या वेळी ही बाईक पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर सोडली जाई. ही लांबलचक बाईक वजनाने हलकी आणि त्वरित जोडता येई.

10 – एरोमोटोसाइक्लेट (Aéromotocyclette)

Aéromotocyclette
via oldmachinepress.com

अर्नेस्ट आर्चीडॉन हे नावाजलेले फ्रेंच डिझायनर होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही भन्नाट कल्पना बनवल्या होत्या त्यापैकी एरोमोटोसाइक्लेट ही एक. ही मोटारसायकल तशी ८० प्रति किलोमीटर वेगाने चालायची.

९ – केटेनक्रॅड ( Kettenkrad )

Kettenkrad
via tankandpurpose.com

जर्मन तंत्रज्ञानाची नेहमीच वाहवाह केली जाते आणि त्याचेच उदाहरण म्हणजेच केटेनक्रॅड. जर्मन लोकांनी युद्धकाळात खूप भन्नाट अशा मशीन्स बनवल्या होत्या. केटेनक्रॅड युद्धासाठी बनवलेली खास मोटारसायकल होती. “Ketten” म्हणजे “Tracks” आणि “Kratrad” म्हणजे “Motorcycle”. जर्मनांनी एकूण ८ हजार अशा मोटारसायकल बनवल्या होत्या त्यापैकी फक्त मोजक्याच आता शिल्लक आहेत.

८ – एस्कॉट-पुलिन ( Ascot-Pullin )

Ascot-Pullin
pinterest.com

१९२९ मध्ये टॉप रेसर आणि डिझायनर सिरिल पुलिन यांनी त्याकाळची सगळ्यात वेगवान तसेच पहिली हायड्रॉलिक ब्रेक्स आणि Horizontally Mounted Engine asanaari एस्कॉट-पुलिन ( Ascot-Pullin ) बनवली. ही मोटारसायकल तशी १०० किमी वेगाने पाळायची.

७ – ग्लेन कर्टिस व्ही ८ ( Glenn Curtiss V8 )

Glenn Curtiss V8
borntoride.com

ग्लेन कर्टिस हा वेळेच्या पुढे असणारा असा माणूस होता. हे त्याच्या मोटारसायकलच्या डिझाईन वरून लक्षात येते. त्यावेळी जास्तीत जास्त वेगाने चालणाऱ्या गाड्यांचे रेकॉर्डस् हे ट्रेन्सचे असायचे. १९०७ साली ग्लेन याने ग्लेन कर्टिस व्ही ८ या नावाची मोटारसायकल लाँच केली जी तशी २२० प्रति किमी ने धावायची. एखादी मोटारसायकल एवढ्या वेगाने पळू शकते असा साधा कोणी विचार देखील केला नव्हता.

६ – रुग्णवाहिका (WWI Ambulance)

WWI Ambulance
via pinterest.com

नाव आणि फोटो पाहून लक्षात आलं असेल की ही मोटारसायकल एक रुग्णवाहिका म्हणून पहिल्या महायुद्धात वापरली गेली. युद्धाच्या वेळी मोठ्या ऍम्ब्युलन्स ला ये जा कारण सोपं नसल्याने ब्रिटिशांनी ह्या मोटारसायकलचा निर्मिती केली. एका वेळी ही मोटारसायकल दोन रुग्णांना घेऊन जाऊ शकायची.

५ – हेलेसन स्टीम पॉवर्ड (Haleson Steam Powered )

Haleson Steam Powered
via pinterest.com

१९०४ मध्ये गाडी मध्ये इंधन म्हणून वाफेचा वापर होत असे. इंग्लंडच्या विल्यम हेल यांनी २०० सीसी सिंगल सिलेंडर इंजिनची मोटारसायकल लाँच केली. हेलेसन स्टीम पॉवर्ड ही त्यावेळची प्रसिद्ध मोटारसायकल होती, आणि जसा जसा पेट्रोल इंजिनची सुरुवात झाली तशी ही मोटारसायकल मागे पडली.

४ – शिलोवस्की गायरोकर ( Shilovsky Gyrocar )

Shilovsky Gyrocar
via jalopnik.com

एका रोल्स रॉयस एवढी लांब असणारी ही मोटरसायकल आहे, फोटो बघून त्याकाळचे डिझायनर किती वेडे होते याची कल्पना येते. ही रशियन डिझाइनर पेट्रोविच सकिलोवस्की बनवलेली मोटारसायकल आहे.

३ – मोनोव्हील (Monowheel)

Monowheel
via reddit.com

ह्या मोटारसायकलची तुम्ही कल्पना देखील केली नसावी. फक्त एका चाकाची ही बाईक स्विस इंजिनिअर एम. गेरदेस यांनी १९३१ मध्ये बनवली. गेरदेस दावा करत होते की ही मोटारसायकल ताशी १५० किमी वेगाने पळू शकते पण त्याची खऱ्या अर्थाने कधी पुष्टी नाही झाली.

२ – स्लेह सायकल ( Sleigh Cycle )

Sleigh Cycle
via pinterest

अशा प्रकारच्या मोटरसायकल तुम्ही जुन्या चित्रपटात नक्कीच पहिल्या असणार. पण ही थोडीशी वेगळी आहे. थोडीशी? नाही ही खूपच वेगळी आहे. कॅनडामध्ये ह्या मोटारसायकलचा शोध लागला आणि बर्फ़ाळ प्रदेश असल्यामुळे बर्फावर चालू शकण्यासाठी चाकांच्या खाली स्केटिंगला वापरतात तशी प्लेट आहे.

१ – इंडियन वॉरिअर स्की स्काऊट ( Indian Warrior Ski Scout )

Indian Warrior Ski Scout
via: oldmotodude.com

नावावरती नका जाऊ ही एक अमेरिकन कंपनी आहे जिची सुरुवात जॉर्ज एम. हॅन्डी यांनी १८९७ मध्ये हॅन्डी मॅनुफॅक्चरिंग कंपनी (Hendee Manufacturing Company) या नावाने केली होती आणि सन १९०१ मध्ये त्याच नाव बदलून इंडियन मोटारसायकल असं केलं. आज देखील बाजारात तुम्हाला इंडियन मोटारसायकल पाहायला मिळतील. जवळपास रॉयल एनफिल्डच्या बुलेट सारखी दिसणारी ही मोटारसायकल थोडी वेगळी आहे. तिला खास बर्फाच्या प्रदेशात चालवण्यासाठी बनवलं होत पण तीची विक्री म्हणावी तेवढी नाही झाली.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *