योजना
Pradhan Mantri Aawas Yojna : पंतप्रधान मोदी खात्यात ट्रांसफर करणार ७०० कोटी, जर तुम्ही ह्या योजनेत नोंदणी केला असाल तर चेक करा अकाउंट
Published
2 years agoon
By
Kokanshaktiप्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत, पहिला हप्ता लाभार्थ्यांना त्यांच्या पक्क्या घरांसाठी हस्तांतरित केला जाईल. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
‘कच्चा’ घराच्या व्याख्येत केले बदल
पीएमओने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर आणि त्रिपुराची अनोखी भौगोलिक-हवामान परिस्थिती लक्षात घेऊन, या राज्यासाठी ‘कच्चा घर’ ची व्याख्या विशेषत: बदलण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक लोकांना मोठ्या संख्येने मदत मिळू शकेल.
योजनेचा पहिला हप्ता हस्तांतरित केला जाईल
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी आज लाभार्थींच्या बँक खात्यात पहिला हप्ता हस्तांतरित करतील.
PMAY-G अंतर्गत किती पैसे उपलब्ध आहेत ?
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत, मैदानी भागात (उत्तर प्रदेश सारख्या) राहणाऱ्या लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपयांचे 100 टक्के अनुदान दिले जाते. त्याच वेळी, उत्तर-पूर्व, जम्मू-काश्मीर आणि लडाखसारख्या डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना 1 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
तुम्ही तुमचा स्टेटस कसा तपासू शकता
ज्या लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केले आहेत ते त्यांच्या ऑनलाइन अर्जाची स्थिती याप्रमाणे तपासू शकतात. ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम PMAY वेबसाइटवर जा. जिथे तुम्हाला सिटीझन असेसमेंटचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
या पेजवर Track Your Assessment Status हा पर्याय दिसेल. त्यानंतर त्यावर क्लिक करा. त्यानंतर त्यात तुमचा नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती भरा. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, शहर निवडा आणि सबमिट करा. यानंतर तुमची ऑनलाइन अर्जाची स्थिती आज तुमच्या स्क्रीनवर दिसेल.