Connect with us

देश

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! तब्बल ‘इतक्या’ रजा वाढणार अन सोबत बरेच काही…

Published

on

[ad_1]

नवीन वेतन संहितेबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच्या फायद्यातोट्याबाबत वादविवाद सुरु आहेत. या नवीन कायद्याची अंमलबजावणी ऑक्टोबर 2021 मध्ये होणार होती. परंतु राज्य सरकारांच्या विविध कारणांमुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही. 

आता हा नियम पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये लागू केला जाऊ शकतो. या कालावधीपर्यंत सर्व राज्ये त्यांच्या नियमांचा मसुदा तयार करतील. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार, सुट्या आदींमध्ये बदल होणार आहेत. त्याचे तपशील जाणून घेऊया.

1. वर्षातील सुट्ट्या वाढून 300 पर्यंत जातील

कर्मचार्‍यांची अर्जित रजा 240 वरून 300 पर्यंत वाढविली जाऊ शकते. कामगार संहितेच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योगाचे प्रतिनिधी यांच्यात अनेक तरतुदींवर चर्चा झाली. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची अर्जित रजा 240 वरून 300 पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.

2. पगाराचे स्ट्रक्चर बदलेल

नवीन वेतन संहितेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगार स्ट्रक्चर मध्ये बदल होणार असून, त्यांचा टेक होम पगार कमी केला जाऊ शकतो. कारण वेतन संहिता कायदा, 2019 नुसार, कर्मचाऱ्याचा मूळ पगार कंपनीच्या (CTC) खर्चाच्या 50% पेक्षा कमी असू शकत नाही. सध्या अनेक कंपन्या मूळ पगार कमी करतात आणि वरून जास्त भत्ते देतात त्यामुळे कंपनीवरचा बोजा कमी होतो.

3. नवीन वेतन संहितेत काय विशेष आहे?

अशा अनेक तरतुदी नवीन वेतन संहितेत देण्यात आल्या आहेत, ज्याचा परिणाम अगदी कार्यालयात काम करणाऱ्या पगारदार वर्गापासून तर थेट गिरण्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर देखील आहे.

कर्मचार्‍यांच्या पगारापासून तर त्यांच्या सुट्या आणि कामाच्या तासांमध्येही बदल होणार आहेत. नवीन वेतन संहितेतील काही तरतुदी जाणून घेऊया, ज्यांच्या अंमलबजावणीनंतर तुमचे आयुष्य खूप बदलेल.

4. कामाचे तास वाढतील आणि साप्ताहिक सुट्टी देखील वाढेल

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वेतन संहितेनुसार कामाचे तास 12 तासापर्यंत वाढणार आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, प्रस्तावित कामगार संहितेत आठवड्यात 48 तास कामाचा नियम लागू असेल असे म्हटले आहे, प्रत्यक्षात काही संघटनांनी 12 तास काम आणि 3 दिवसांच्या सुट्टीच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

यावर सरकारने स्पष्टीकरण देताना सांगितले की, आठवड्यात 48 तास काम करण्याचा नियम असेल, जर कोणी दिवसातून 8 तास काम केले तर त्याला आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल आणि एक दिवस सुट्टी मिळेल.

जर एखाद्या कंपनीने दिवसातील 12 तास काम स्वीकारले तर उर्वरित 3 दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी लागेल. जर कामाचे तास वाढले तर कामाचे दिवस देखील 6 ऐवजी 5 किंवा 4 होतील. मात्र यासाठी कर्मचारी आणि कंपनी या दोघांमध्येही करार असणे आवश्यक आहे.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *