योजना
Train On Rent: आता ट्रेन ही मिळणार भाड्याने, रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Published
2 years agoon
By
Kokanshaktiभारत सरकार नेहमीच उपक्रमशील योजना राबवत असते. आता आणखी एक योजना राबवली जाणार आहे. भारतीय रेल्वेने आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक खास ऑफर दिली आहे.(Train on rent)
आता अशी योजना देशात सुरू करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत कोणतेही राज्य किंवा व्यक्ती ट्रेन भाड्याने घेऊ शकते.
या ट्रेन्सना ‘भारत गौरव ट्रेन’ असे नाव देण्यात आले आहे. ट्रेन नेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील आणि त्या बदल्यात रेल्वे त्यांच्याकडून किमान भाडे आकारेल.
देशात चालतील भारत गौरव ट्रेन
देशात सध्या 180 भारत गौरव ट्रेन चालवण्याची योजना असून त्यात तीन हजारांहून अधिक डबे असतील. यासाठी रेल्वेने आजपासून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, भारत गौरव ट्रेन खाजगी क्षेत्र आणि IRCTC या दोघांद्वारे चालवल्या जाऊ शकतात. तसेच, त्याचे भाडे टूर ऑपरेटर ठरवेल. या गाड्या भारताची संस्कृती, वारसा दर्शविणाऱ्या थीमवर आधारित असतील, यासाठी सुमारे 180 गाड्या निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रवासी, मालवाहतुकीनंतर आता रेल्वे पर्यटनासाठी रेल्वेचा तिसरा विभाग सुरू करणार आहे.
पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश आहे
योजनेची घोषणा करताना, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भागधारक या गाड्या आधुनिक करतील आणि चालवतील तर रेल्वे या गाड्यांची देखभाल, पार्किंग आणि इतर सुविधा पुरविण्याचे काम करेल.
ते म्हणाले की, या ट्रेन रेगुलर ट्रेन सर्विस सारखी नसतील किंवा ती सामान्य रेल्वे सेवा नाही. भारत गौरव ट्रेनचा मुख्य उद्देश भारतातील पर्यटनाला चालना देणे हा आहे.
सध्या केवळ पर्यटनावर लक्ष केंद्रित करून या गाड्यांचे संचालन सुरू करण्यात येत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. रेल्वेला भारतीय संस्कृती आणि सभ्यतेशी जोडले गेले पाहिजे, त्यामुळेच भारताचा अभिमान दाखवण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आजपासून अर्ज घेणे सुरू झाले असून या विशेष गाड्या कोणत्याही राज्य, व्यक्ती किंवा संस्थेद्वारे चालवल्या जाऊ शकतात.