क्रिडा
पुजारा-रहाणे नव्हे, तर ‘हा’ फलंदाज मुंबई कसोटीतून होऊ शकतो बाहेर; पाहा संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
Published
2 years agoon
By
Kokanshaktiन्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा सामना अनिर्णीत राहिला होता. तर मुंबईच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठीची प्लेइंग कशी असेल याबाबत चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
मुंबईच्या मैदानावर जर भारतीय संघाला सामना संघाला विजय मिळवायचा असेल, तर परिस्थितीनुसार संघात बदल करावे लागतील. तसेच विराट कोहलीचे पुनरागमन झाल्यामुळे कुठल्या तरी एका फलंदाजाला माघार घ्यावी लागणार आहे. अशातच कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरत असल्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परंतु, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांम्ब्रे यांनी त्याचा बचाव करत तो पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली आहे. ज्यावरून अजिंक्य रहाणेला संघाबाहेर करणे कठीण दिसून येत आहे. विराट कोहलीला संघात स्थान देण्यासाठी ज्या फलंदाजाला संघाबाहेर केले जाऊ शकते, तो फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून मयांक अगरवाल आहे.
गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांम्ब्रे यांनी म्हटले होते की, मुंबई कसोटीत वृद्धिमान साहा खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तो जर फिट झाला नाही, तर त्याच्या ऐवजी केएस भरतला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. कारण कानपूर कसोटीत वृद्धिमान साहा दुखापतग्रस्त असताना केएस भरत यष्टिरक्षण करण्यासाठी मैदानावर आला होता. जर केएस भरतला पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर तो शुबमन गिल सोबत डावाची सुरुवात करू शकतो. तर पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या मयांक अगरवालला बाहेर करून विराट कोहली आपल्या ठरलेल्या ठिकाणी फलंदाजी करू शकतो.
मयांक अगरवालला पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १३, तर दुसऱ्या डावात अवघ्या १७ धावा करण्यात यश आले होते.
मुंबई कासोटीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ शुबमन गिल, वृद्धिमान साहा/ केएस भरत, विराट कोहली (कर्णधार),अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा,आर अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, उमेश यादव
You may like
‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय? वाचा यामागची लक्षणं आणि उपचार
Government Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ! तुम्हाला माहीत आहे का ?
G-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?
TARKARLI BEACH – तारकर्ली मध्ये करण्यासारख्या १५ गोष्टी
‘या’ पाकिस्तानी चित्रपटानं मोडला RRR चा रेकॉर्ड? जाणून घ्या सत्य
मार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय