देश
मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख ‘जनयोद्धा’, हत्येचा बदला घेणार; नक्षलवाद्यांकडून सहा राज्यांत बंद
Published
2 years agoon
By
Kokanshaktiनक्षलवाद्यांनी एक परिपत्रक जारी केलं असून त्यामध्ये टॉप नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे याचा उल्लेख ‘जनयोद्धा’ असं करण्यात आला आहे. गडचिरोलीत झालेल्या नक्षलवाद्यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकीही देण्यात आली आहे. तसेच सहा राज्यांत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
काय आहे नक्षलवाद्यांच्या पत्रकात?
भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीचा केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय याच्या नावे पत्रक जारी करण्यात आलं आहे. मिलिंद तेलतुंबडे याला जनयोद्धा असं संबोधलं असून मृत नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सभा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नक्षल्यांचा बंद महाराष्ट्र- छत्तीसगड- ओडिशा- तेलंगणा-आंध्रप्रदेश राज्यात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकात मिलिंद तेलतुंबडे यांनी केलेल्या जंगल आणि शहरी क्षेत्रातील नक्षली आंदोलनाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मिलिंद तेलतुंबडे आणि अन्य नक्षली यांच्या मृत्यूने आंदोलनाची मोठी हानी झाल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
मोठ्या चकमकीनंतर जारी होणाऱ्या पत्रकात पोलिसांना दोष देण्याची असलेली भाषा ताज्या पत्रात नसल्याने यंत्रणांना आश्चर्य वाटत आहे.