
[ad_1]
एकीकडे गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात पडझड जरी होत असली तरी दुसरीकडे म्युच्युअल फंडमध्ये मात्र गुंतवणूकदारांचा रस वाढताना दिसतो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यातच म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे.
विशेष म्हणजे रिटेल गुंतवणूकदार म्हणजेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडची लोकप्रियता वाढताना दिसते. तर ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक 10 हजार 519 कोटींची गुंतवणूक कऱण्यात आली. तर गेल्या वर्षी हीच गुंतवणूक 96 हजार कोटींची होती. अद्याप यंदाच्या आर्थिक वर्षाचे 5 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे साहजिकच पुढील पाच महिन्याची आकडेवारी ही अधिक असू शकते.
[ad_2]