Connect with us

क्रिडा

रहाणे पुजाराला मागे टाकत हा युवा धडाकेबाज फलंदाज झाला कसोटी संघाचा उपकर्णधार

Published

on

[ad_1]

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया आफ्रिकेत (India Tour Of South Africa)  दाखल झाली आहे. कसोटी मालिकेला (Ind VS Sa Test Series) 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेपासून रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची (Vice Captaincy) जबाबदारी देण्यात आली होती . मात्र रोहितला दुखापत झाल्याने तो या मालिकेतून बाहेर पडला.

दरम्यान त्यानंतर उपकर्णधारपदाची जबाबदारी कोणाला मिळणार, अशी चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. (india tour of south africa KL Rahul to give vice captaincy charge for test series against south africa)   

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर के एल राहुलला उपकर्णधारपदाची (K L Rahul Vice Captain) जबाबदारी देण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र बीसीसीआयकडून (BCCI) याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रोहितला या महत्त्वाच्या कसोटीआधी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यामुळे रोहितला कसोटी मालिकेला मुकावं लागलं. रोहितच्या दुखापतीमुळे केएलला ही उपकर्णधारपदाची संधी मिळाली आहे. 

Advertisement

उपकर्णधारपदासाठी अनुभवी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रवीचंद्रन अश्विनचं (R Ashwin) नावही चर्चेत होतं. मात्र एएनआयच्या वृत्तनुसार, केएलने या 2 दिग्गजांना मागे टाकत उपकर्णधारपद मिळवलं आहे. 

कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू– नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अरजान नगवासवाला.

आफ्रिकन टीम 

Advertisement

डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, एनरिक नॉर्तजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डुर डुसेन, कायल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.  

कसोटी मालिकेचं वेळापत्रक 

पहिला सामना 26-30 डिसेंबर,  सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.  

दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.  

तिसरा सामना,  11-15 जानेवारी 2022,  केपटाऊन.  

Advertisement

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2021 Kokanshakti. Theme by MVP Themes, powered by WordPress.