Connect with us

क्रिडा

India Vs Pakistan: “19 व्या षटकात बॅकफूटवरून सिक्स मारणं म्हणजे…”, सचिन तेंडुलकरनं केलं विराटचं कौतुक

Published

on

Sachin Tendulkar On Virat Kohli: भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे मैदानातील युद्धच असतं. मैदानात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर एक दबाव असतो. त्यात सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सांगायलाच नको. शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव घेतली आणि विजय खेचून आणला. असं असलं तरी या विजयाचं संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जातं.