Connect with us

तंत्रज्ञान

Google Chrome वापरताय? तुमचा डेटा लीक होऊ शकतो. ब्राऊझर डिलीट करण्याचा तज्ञांचा सल्ला

Published

on

Google Chrome गुगल क्रोम आता सगळ्याच फोनमध्ये वापरले जाते. मग तो फोन अँड्रॉइड असो वा अयफोन, सगळेच यूझर्स आपल्या फोनमध्ये या ब्राऊझरचा वापर करतात. गुगल ब्राउझरचे वापरकर्ते करोडोंच्या घरात आहेत. परंतु आता या युजर्सची सुरक्षा एकत्रितपणे धोक्यात आली आहे. गुगल क्रोम ब्राउझरच्या वापरकर्त्यांना असा इशारा देण्यात आला आहे की, वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमधून क्रोम ब्राउझर त्वरित हटवावे, अन्यथा त्यांचा डेटा लीक होऊ शकतो.

यात दिलासादायक बातमी अशी की, ही चेतावणी मोबाइल वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आली आहे, डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी नाही.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, गोपनीयता आणि डेटा लीकमुळे वापरकर्त्यांना फोनमधून क्रोम ब्राउझर हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे. अलीकडे, फेसबुकवर आरोप करण्यात आले की ते गुप्तपणे वापरकर्त्यांच्या लोकेशनची माहिती गोळा करत आहे. तसेच फेसबुक त्याच्या वापरकर्त्या काय करतो, त्याच्या डेटाचे रेकॉर्ड देखील ठेवत आहे.

रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा स्वतःसाठी गोळा करत असे, तर गुगल क्रोम थर्ड पार्टीसाठी डेटा गोळा करत आहे. अहवालानुसार, Google Chrome वापरकर्त्यांची प्रत्येक गोष्ट आणि ऍक्शन रेकॉर्ड करत आहे.

Apple ने काही दिवसांपूर्वी मोशन सेन्सर ऍक्सेस बाय डीफॉल्ट बंद केला होता, परंतु Google ने Android वापरकर्त्यांसाठी असे काहीही जारी केलेले नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या महिन्यात गुगल क्रोम वापरकर्त्यांना हॅकिंग आणि डेटा लीक संदर्भात इशारा देण्यात आला होता आणि आता ही चेतावणी दुसऱ्यांदा जारी करण्यात आली आहे.

अहवालानुसार, गुगल क्रोमचे 2.6 अब्ज वापरकर्ते यामुळे प्रभावित झाले आहेत. गुगलच्या प्रवक्त्याने या अहवालावर म्हटले आहे की, आधीच्या तुलनेत मोशन सेन्सरवर मर्यादित प्रवेश आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.