Connect with us

देश

Air India Tata : एअर इंडियामध्ये आजपासून ‘टाटा’ राज; या सेवेद्वारे प्रवाशांच्या सेवेत

Published

on

[ad_1]

Air India Handover To Tata: भारत सरकारची विमान कंपनी असलेल्या एअर इंडियामध्ये आजपासून टाटा समूह आपली सेवा सुरू करणार आहे. एअर इंडियाचा मालकी हक्क टाटा समूहाकडे सोपवताच निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एअर इंडियाचे संचलन टाटा समूह करणार असून लवकरच इतर औपचारिक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

केंद्र सरकारने तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एअर इंडियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. केंद्र सरकारने निविदा प्रक्रियेनंतर 8 ऑक्टोबर 2021 रोजी 18 हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाच्या ‘टॅलेस प्राइव्हेट लिमिटेड कंपनी’ला एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली असून गुरुवारपासून टाटा समूह एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करणार आहे. 

अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, टाटा समूह गुरुवारपासून मुंबईहून उड्डाण घेणाऱ्या चार विमानांमध्ये जेवणाची सेवा पुरवणार आहे. या द्वारे टाटा समूह एअर इंडियामध्ये आपल्या सेवेची सुरुवात करणार आहे. मात्र, एअर इंडियाची उड्डाणे ही टाटा समुहाच्या नावाखाली होणार नाहीत. 

टाटा समुहाकडून संचलित होणाऱ्या विमान सेवेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना त्याबाबत कल्पना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात टाटा समूह पूर्णपणे एअर इंडियाची विमान सेवा संचलित करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि ‘टाटा’मधील करारानुसार टाटा समूहाला एअर इंडिया एक्सप्रेस आणि ग्राउंड हँडलिंग आर्म एअर इंडिया SATS मधील 50 टक्के भागभांडवलही सुपूर्द केले जाणार आहे. 

एअर इंडियाचा संपूर्ण ताबा आल्यानंतर टाटा समुहाकडे तीन एअरलाइन्स कंपन्या असणार आहेत. टाटा समुहाकडे विस्तारा आणि एअर एशिया या विमान कंपन्या आहेत.

[ad_2]