Connect with us

देश

68 वर्षांनतर अखेर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे

Published

on

मुंबई : कर्जाच्या खाईत असलेल्या सरकारी मालकीची एअरलाईन्स कंपनी एअर इंडियाचा  (Air India) ताबा आता टाटा समूहाकडे गेला आहे. टाटा समूहाच्या वतीनं सर्वाधिक बोली लावण्यात आली आणि 68 वर्षांनंतर, जेआरडी टाटा यांनी 1932 साली स्थापन केलेल्या एअर इंडियाची मालकी परत मिळवली आहे. रतन टाटा यांनी एक जुना फोटो शेअर करत ‘वेलकम बॅक एअर इंडिया’ असं ट्वीट केलं आहे.

रतन टाटांनी म्हटलंय की, “जेआरडी टाटांनी स्थापन केलेली ही विमान कंपनी एकेकाळी जगातल्या प्रतिष्ठीत विमान कंपन्यांपैकी एक होती. आताही तीच प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचा टाटा समूहाचा प्रयत्न असेल.”