म्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर विराट कोहलीला घाबरतात
बिग स्पोर्ट ब्रेकफास्ट ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा २०१५ चा विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्कने म्हटले आहे की अलीकडच्या काही काळात भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली तसेच संघातील इतर खेळाडूंना ऑस्ट्रेलियन खेळाडू थोडे दचकून असत.
१९८७ चा विश्वकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट जगात एक महासत्ता म्हणून उदयाला आली. स्टीव्ह वॉ या काळामध्ये नंतर सलग दोन वेळा विश्व कप जिंकणारा कर्णधार रिकी पॉंटिंग यांच्या कारकिर्दीत तर खूपच भक्कम झाली. ऑस्ट्रेलियन खेळाडू हे नेहमीच मैदानावर आक्रमक असायचे. आपल्या आक्रमक स्वभावाने ते नेहमी प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली टाकायचे.
२००१ साली झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धा रोमांचक व्हायला लागल्या आणि त्यापासून ते आतापर्यंत दोन्ही संघाच्या खेळाडूंना मध्ये मैदानावर अनेकदा शाब्दिक चकमकी घडल्या.
सगळ्यात प्रसिद्ध असं २००८ सालचा “मंकी गेट” प्रकरण, तुम्हा सगळ्यांच्या चांगलेच लक्षात असेल. हरभजन सिंग आणि अँड्रू सायमंड यांच्यातला तो वाद दोन्ही संघातील आजपर्यंतचा खूप खालचा स्थराचा होता. त्यानंतर देखील अनेकदा दोन्ही संघातील खेळाडूंच्या शाब्दिक चकमकी घडल्या.
मागील काही वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील शाब्दिक चकमकी जरी कमी झाल्या नसल्या तरी मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आक्रमकपणा थोडा कमी झाल्याचे दिसून येते विशेष करून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली समोर.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अस आम्ही का म्हणतोय. हे आम्ही नाही, ऑस्ट्रेलियाला संघाचा माजी विश्व कप विजेता कर्णधार मायकल क्लार्क याने हा खळबळजनक दावा केला आहे. मायकल क्लार्कच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू तसेच इतर देशांचे ही खेळाडू भारतीय खेळाडूंच्या विरुद्ध थोडे कमी आक्रमक होतात.
त्याच्या मागचा मुख्य कारण म्हणजे दरवर्षी एप्रिल-मेमध्ये होणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ही स्पर्धा. बीसीसीआय हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटच बोर्ड आहे. त्याचप्रमाणे आयपीएल ही स्पर्धा जगातील इतर देशांच्या तुलनेत खेळाडूंसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते.
या आयपीएल स्पर्धेमध्ये संघातील जास्तीत जास्त खेळाडू हे ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, वेस्टइंडीज, या देशांचे असतात. देशांमध्ये तुलना केली तर दरवर्षी ओवरसीज प्लेयर हे ऑस्ट्रेलियातून सर्वाधिक येतात.
मायकल क्लार्क चे असे म्हणणे आहे, या स्पर्धेमुळे ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना आर्थिक दृष्ट्या खूप फायदा होतो. जर एखादा खेळाडू मुंबई, चेन्नई, बेंगलोर यासारख्या संघांमध्ये निवडले गेला तर त्या खेळाडूला सर्वाधिक पैसे कमावण्याची संधी असते. आणि म्हणूनच बरेच ऑस्ट्रेलियन खेळाडू हे भारतीय क्रिकेटर्सच्या गुड बुक्स मध्ये राहणं पसंत करतात.
मायकल क्लार्क च्या म्हणण्यानुसार त्याच्या संपर्कातील काही खेळाडू या गोष्टीमुळे मैदानावर ती आक्रमक पवित्रा घेत नाहीत. तो असे म्हणाला, या प्रकारच्या शाब्दिक चकमकी आधी व्हायच्या त्या प्रकारच्या आता होत नाहीत कारण ऑस्ट्रेलियन खेळाडूंना असे वाटते की, त्यांनी मैदानावर ती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला स्लेजींग केली, तर त्याचा परिणाम यांच्या आयपीएलच्या निवड प्रक्रियेवरती होऊ शकतो.
माजी कर्णधार मायकल क्लार्क हेही म्हणाला की फक्त ऑस्ट्रेलियाच नाही, इतर देशांचे खेळाडू देखील विराट कोहली भारतीय संघ यांच्याशी खेळताना मैदानामध्ये हे पवित्रा घेतात.
खरच मायकल क्लार्क च्या म्हणण्याप्रमाणे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू विराट कोहलीला घाबरतात काय? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा. त्याच प्रमाणे तुमचा एखादा अविस्मरणीय स्लेजिंगचा क्षण जो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झाला आहे.
Post Comment