‘कोव्हॅक्सीन’ घेतल्यानंतर पॅरासिटामोलची गरज नाही – भारत बायोटेक
[ad_1]
हैदराबाद: कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सीन’ लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल व अन्य वेदनाशामक गोळ्या घेण्याची काहीही आवश्यकता नाही, असे ही लस विकसित करणाऱ्या हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीने बुधवारी स्पष्ट केले. लस घेतल्यानंतर येणारा ताप, थंडी यासारखे किरकोळ दुष्परिणाम थोपविण्यासाठी लसीकरण केंद्राकडून नागरिकांना या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात होता. पण कंपनीने लस घेतल्यानंतर या औषधांची काहीही गरज नसल्याचे ट्विटरवरून म्हटले आहे. लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल व अन्य वेदनाशामक गोळा घेण्याची कुठल्याही प्रकारची शिफारस करण्यात आली नाही.
जवळपास ३० हजार जणांवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये फक्त १० ते २० टक्के जणांमध्ये किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. पण ही सौम्य लक्षणे एक ते दोन दिवसात बरी होत असल्याने त्यासाठी कुठल्याही औषधांची गरज नाही. अन्य कोरोना प्रतिबंधक लसींसाठी पॅरासिटामोलची शिफारस करण्यात आली होती. आमच्या लसीसाठी नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
[ad_2]
Post Comment