×

ज्यांना पाठीशी घातलं त्यांनीच दगा केला, विराटची तक्रार करणाऱ्यांची नावे आली समोर, ऐकून धक्का बसेल

ज्यांना पाठीशी घातलं त्यांनीच दगा केला, विराटची तक्रार करणाऱ्यांची नावे आली समोर, ऐकून धक्का बसेल

मुंबई : विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं. खेळावर ताण येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. पण कुठेतरी संघातील वादांमुळे अशाप्रकारचा निर्णय विराटने घेतली असल्याची चर्चा होतीच. आता या चर्चेसबंधित एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. टीम इंडियामध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हाव लागलं होतं. त्यानंतर संघातील सीनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी एका गोष्टीवरुन कर्णधार विराट कोहलीविरोधात (Virat Kohli) बीसीसीआयकडे (BCCI) तक्रार केली होती. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने न्यू इंडियन एक्सप्रेस याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार पुजारा आणि रहाणे या सीनियर खेळाडूंनी विराट कोहलीविरोधात BCCI चे सेक्रेटरी जय शाह यांच्याकडे स्वत: फोन करुन तक्रार केली होती. या रिपोर्टमध्ये पराभवानंतर विराटने रहाणे आणि पुजारा या दोघांची सर्व संघासमोर खिल्ली उडवल्याची तक्रार दोघांनी केली होती. टीम इंडियामध्ये फूट पडली आहे, अशा आशयाच्या बातम्या सतत्याने येत आहेत. त्यावर आता बीसीसीआयच्या बाजूने प्रतिक्रिया आली आहे. यामध्ये नाराजी आणि संघात फूट पडणे असे दावे नाकारण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या वतीने असे म्हटले गेले आहे की, कोहलीच्या टी-20 चे कर्णधारपद सोडण्यात निर्णयात त्यांचा कोणताही हात नाही आणि स्वतः कोहलीनेच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या प्रकरणी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “माध्यमांनी काहीही लिहिण्यापासून परावृत्त झाले पाहिजे. कोहलीबद्दल कोणत्याही खेळाडूने बीसीसीआयकडे लेखी किंवा तोंडी तक्रार केलेली नाही. बीसीसीआय प्रत्येक खोट्या बातम्यांना प्रतिसाद देणार नाही. एक दिवसापूर्वी असे दिसून आले होते की, भारताच्या विश्वचषक संघातील बदलांबद्दल काही बातम्या प्रसिद्ध झाल्या, हे कोणी केलं, कोण म्हणालं?”

विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबद्दल धुमाळ म्हणाले की, “विराटने टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर निर्णय घेतला आणि बीसीसीआयला कळवले. आज मीडिया म्हणत आहे की, खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रार केली. त्यामुळे मंडळाच्या वतीने मी सांगतो की कोणतीही तक्रार आलेली नाही. आणखी काही समस्या आहे का?”

बीसीसीआयने मीडिया रिपोर्ट्सवर प्रश्न उपस्थित केले


बीसीसीआयकडून असे सांगण्यात आले आहे की, कोहलीने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर 24 तासांच्या आत अशा प्रकारच्या बातम्या आल्या की, माध्यमांना टीम इंडियामधील आतल्या सगळ्या बाबी माहिती आहेत. मात्र विराटने कर्णधारपद सोडण्यापूर्वी याबाबत कोणतीही माहिती नव्हती. धुमाळ म्हणाले, “अशा बातम्यांमुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान होते. आम्ही समजू शकतो की, संघ खेळण्याच्या पद्धतीवर वरिष्ठ पत्रकारांचे मत असते, परंतु ते एक मत आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. मात्र आपल्या मनाने कथा विणणे योग्य नाही.”

माध्यमांच्या अहवालांमध्ये असे म्हटले होते की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर कोहलीने खेळाडूंना फटकारले होते. यानंतर, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी कोहलीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचप्रमाणे अश्विनच्या तक्रारीचा दावाही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे मीडिया रिपोर्टमध्ये?

रिपोर्टनुसार, ”भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंडला गेला असताना सर्व काही ठिक होतं. पण WTC Final मध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभव मिळताच सारं काही बदललं. या सामन्यात भारतीय फलंदाजानी मोठी निराशा केली. त्यामुळे साहजिकच याचं सर्वाधिक खापर वरिष्ट फलंदाज रहाणे आणि पुजारावरच फुटणार होतं, तसंच काहीसं झालं. सूत्रांच्या माहितीनुसार या मोठ्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीने पुजारा आणि रहाणे यांची खिल्ली उडवली. पुजाराच्या स्लो स्ट्राइक रेटवर प्रश्न उपस्थित केले. तर रहाणेच्या खराब फॉर्मला विराटने टार्गेट केलं. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोघांनीही BCCI सेक्रेटरी जय यांना स्वत: फोन करत याबाबत तक्रार केली.

आणखी एका दिग्गज खेळाडूची विराटविरोधात तक्रार!
भारताचा दिग्गज फिरकीपटू आर आश्विन (R Ashwin) याने देखील विराटच्या वागणूकीची बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे यानंतर विराटने देखील आश्विनवर राग काढत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात आश्विनला मुद्दाम संघाबाहेर ठेवल्याचंही समोर येत आहे.

Post Comment