Connect with us

मनोरंजन

शाहरुख खानचे Daily Routine काय असते? स्वतः केला खुलासा, दिवसातून एकदाच जेवतो अन् रात्री उशिरा….

Published

on

[ad_1]

बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचे चाहते फक्त भारत नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. शाहरुख खानचा लूक, लाइफस्टाइल चाहत्यांना नेहमी आकर्षित करत असतात. शाहरुख खानचा फिटनेसही त्याचा चाहत्यामध्ये चर्चेचा विषय असतो.

शाहरुख खान काय खात असेल, त्याची दिनचर्या कशी असेल याबाबत सर्वांना उत्सुकता असते. दरम्यान एका मुलाखतीत शाहरुख खानने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. आता शाहरुख खान रात्री उशीरापर्यंत जागा असतो हे काही चाहत्यांना नव्याने सांगण्याची गरज नाही.

सोशल मीडियावरून तो रात्री उशीरापर्यंत चाहत्यांशी संवाद साधत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की शाहरुख खान दिवसातून फक्त एक वेळ जेवतो तसंच काही झाले तरी जिमला जातो. मग तो व्यायाम फक्त अर्ध्या तासांसाठी का असेना?

शाहरुखने ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो दिवसातून फक्त एकदाच जेवतो. यामागे इंटरमिटेंट फास्टींग कारण नसून ही आपली वैयक्तिक निवड आहे.

Advertisement

“मी पहाटे पाच वाजता झोपायला जातो. जेव्हा मार्क वाह्लबर्ग (अमेरिकन अभिनेता) उठतो, तेव्हा मी झोपायला जातो. मी शूटिंग करत असल्यास नऊ किंवा दहाच्या सुमारास उठतो. मग रात्री उशिरा २ वाजेपर्यंत घरी येतो. नंतर आंघोळ करतो आणि मग मी झोपायला जाण्यापूर्वी व्यायाम करतो.

याच मुलाखतीत ५५ वर्षीय अभिनेत्याने आपण जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा एथलीट होतो असे सांगितले. तसंच सुरुवातीच्या दिवसामध्ये आपली ऍक्शन हिरो होण्याची इच्छा होती असेही सांगितले. “जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो, तेव्हा मी ॲथलीट होतो. माझे स्वप्न होते की

सिक्स-पॅक, पांढरी बनियान, मिठीत एक महिला, चेहऱ्यावर रक्त आणि हातात बंदूक असावी. माझे स्वप्न होते की मी एका खोलीत जातो तेव्हा कोणीतरी विचारत ‘तू कोण आहेस?’ आणि मी त्यांना गोळ्या घालतो ,” असे शाहरुखने सांगितले.

शाहरुख खानला नुकतेच स्वित्झर्लंडमधील ७७व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पारडो अल्ला कॅरीरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार आणि पुरस्कार सोहळ्यांबद्दलच्या त्याच्या प्रेमाबद्दल बोलताना शाहरूखने उपहसात्मकपणे म्हटलं की, “मला यामुळे आनंद मिळतो. मी याबद्दल खूप निर्लज्ज आहे. मला पुरस्कार मिळणे आवडते. मला समारंभ आवडतो.”

तथापि, आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान काहीसा घाबरतो कारण त्याला त्याच्या विनोदी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागते आणि भारतीय चित्रपटाचे प्रतिनिधित्व करावे लागते. “मला माझ्या सर्वोत्तम वर्तनावर राहावे लागेल. कारण भारतासाठी सिनेमा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे,” असे अभिनेता म्हणाला.

Advertisement

शाहरुख खान सुजॉय घोषच्या किंगमध्ये दिसणार आहे, ज्याची त्याने लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृतपणे पुष्टी केली. त्याची मुलगी सुहाना खान त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याची शक्यता आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन विल्हनच्या भूमिकेत असेल.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2021 Kokanshakti. Theme by MVP Themes, powered by WordPress.