Rohit Sharma: भर मैदानात गाणं गाऊ लागला रोहित शर्मा; स्टंप माईकमध्ये कैद हिटमॅनचा सुरेल आवाज
[ad_1]
Rohit Sharma: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सिरीज टीम इंडियाने गमावली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला श्रीलंकेविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माचा एक वेगळाच अंदाज दिसून आला. रोहित शर्माचा गमतीशीर स्वभाव प्रत्येकाला माहिती आहे. मात्र तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या टीमची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्माने एक असं कृत्य केलं, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झालेत.
मैदानावर किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा अनेकदा मस्करीच्या मूडमध्ये दिसून येतो. असंच काहीसं चित्र तिसऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात पहायला मिळालं. बुधवारी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया विकेटसाठी आसुसलेली असताना रोहित शर्मा गाणं गाताना कॅमेरात कैद झाला. त्याचबरोबर आता या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
7 ऑगस्ट रोजी टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तिसरा वनडे सामना खेळला गेला. हा सामन्या जो कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि श्रीलंकेच्या फलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. चारिथ असलंकाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पथुम निसांका, कुसल मेंडिस आणि अविष्का फर्नांडो यांनी आपल्या तुफानी फलंदाजीने टीम इंडियाला खूप त्रास दिला.
भर मैदानात गाणं म्हणत होता रोहित शर्मा
एकीकडे यावेळी कर्णधार रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला. गोलंदाज विकेटसाठी धडपडत असताना, हिटमॅन गाणं गात होता. झालं असं की, अक्षर पटेल गोलंदाजीला आला. यावेली रोहित शर्माने गाणी म्हणायला सुरुवात केली आणि त्याला पटकन गोलंदाजी करण्यास सांगितले. तो गाण्याच्या शैलीत इंग्रजीत “मेक अ हर्री” म्हणू लागला. त्याचबरोबर आता या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. दरम्यान चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
New language, same fun – Ro is just entertainment
Watch the action from #SLvIND LIVE now on Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 3, Sony Sports Ten 4 & Sony Sports Ten 5
#SonySportsNetwork #SLvIND #RohitSharma | @ImRo45 pic.twitter.com/YTuoGBfENC— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 7, 2024
टीम इंडियाने गमावली सिरीज
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात आली होती. यातील पहिला सामना टाय झाला. दोन्ही संघांनी सामना स्कोर केल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियावर 32 धावांनी विजय मिळवला होता. अशातच आता तिसऱ्या सामन्यात देखील टीम इंडियाला पराभव झाल्याने आता टीम इंडियाची नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात असताना टीम इंडियाचा पराभव झालाच कसा? असा सवाल क्रिडाप्रेमी विचारत आहेत.
[ad_2]
Post Comment