Connect with us

ब्लॉग

पितृपक्षात जर हे संकेत मिळाले; तर समजून घ्या..तुमचे दिवस पालटणार ! हे असतात शुभ संकेत

Published

on

आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न आहेत की नाराज आहेत याचे काही संकेत आपल्या हिंदू शास्त्रात सांगितले आहेत. आपले पितर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला खूप फायदा होत असतो,सर्व गोष्टी सुरळीत सुरू असतात आणि जर आपले पितर नाराज असतील तर हा पितृपक्षाचा काळ खूप चांगला आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी.

आपण त्यांची नाराजी दूर करू शकतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो. जेव्हा आपण एखादे कार्य करीत असतो आणि त्या कार्यात कोणतीही अडचण बाधा न येता व्यवस्थितपणे पूर्ण होत असेल तर समजावे की आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न आहेत. कधी कधी एखादे कार्य होत नाही, भीती वाटते की हे कार्य शक्य नाही, हे मी करू शकत नाही, या कामात खूप अडथळे येतील परंतु आपण आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना केली की ते काम अगदी व्यवस्थितपणे यशस्वीरीत्या पूर्ण होते,

या बाबतीतही आपल्या पूर्वजांची आपल्यावर कृपादृष्टी असते कारण पूर्वजांचा आशीर्वाद नसेल तर कोणतेही कार्य पूर्ण होऊच शकत नाही आणि कितीतरी दिवसांपासून घडलेली कार्य आपण पितरांच्या आशीर्वादाने सहज पूर्ण करू शकतो. आपले पितर आपल्यावर प्रसन्न असतील तर त्यांचे श्राद्ध अगदी योग्य प्रकारे व विधीपूर्वक करावे म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला सतत मिळत राहतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपली सर्व कामे सहजरित्या पूर्ण होतील.

जर तुमच्या घरात शांतता असेल, सर्व लोक समाधानी असतील, मुले मोठ्यांचे म्हणणे ऐकत असतील, घरात आनंदी आनंद असेल तर समजावे की आपले पित्र आपल्यावर खूप प्रसन्न आहेत. जर आपण एखादे कार्य करीत असाल व त्यानंतर नेहमी काही ना काही अडचणी येत असतील , काम होता होता अचानक मध्येच बंद पडत असेल, नेहमी आपण कामाच्या टेन्शन मध्ये राहत असाल.

प्रत्येक वेळी काम पूर्ण होत आले असता एखादे मोठे संकट पुढे येऊन ठेपेल तर समजावे की आपले पितर आपल्यावर नाराज आहेत. जर तुमची मुले तुमचे म्हणणे ऐकत नसतील, मोठ्यांचा आदर करीत नसतील, आज आपण मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करीत असतो परंतु मुलांच्या वर्तनामुळे आपण नेहमी दुःखी व चिंतीत राहत असतो,

तर समजावे की आपल्या पितर आपल्यावर नाराजी आहेत, ते मुलांद्वारे आपल्यावर प्रकट होत आहेत, आपली मुले आपल्याला पीडा दुःख त्रास देत असतात तर हे लक्षण आपले पितर आपल्यावर नाराज असल्याचे आहे. जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील तर पितृपक्षात त्यांच्या नावाने श्राद्ध, पिंडदान व अन्नदान अवश्य करावे व त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा.

कधी कधी आपल्याला कुंडली पाहून गुरूजी सांगतात की आपल्या कुंडलीत पितृदोष आहे. म्हणजे आपण योग्य प्रकारे आपल्या पितरांना मान सन्मान देत नाही . आपल्या जीवनात नेहमी काही ना काही अडचणी येतात यावर उपाय म्हणून श्राद्ध करावे. पुढील गोष्ट म्हणजे जर आपल्या घरात नेहमी वादविवाद भांडण-तंटे होत असतील, अगदी लहान-सहान गोष्टींवरून मोठे भांडण होत असेल, घरातील वातावरण नेहमी अशांत राहत असेल, तर समजावे की आपले पूर्वज आपल्यावर नाराज आहेत.

कारण ज्या घरावर पितृ देवाचा आशीर्वाद असतो त्या घरात कधी लहान-सहान गोष्टींवरून भांडणे होत नाहीत आणि कदाचित झाली तर ती लगेचच मिटतात. तुमच्या घरात जर रोज भांडणे वादविवाद होत असतील तर समजून जावे की आपल्याला आता पितरांना प्रसन्न करण्याची गरज आहे.

आपण खूप कष्ट करतो, भरपूर पैसा घरात येतो परंतु टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा सारखा खर्च होतो व वेळेवर आपल्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. असे होत असेल तर समजावे की आपले पितर नाराज आहेत.

म्हणून पितरांचे व्यवस्थित रित्या श्राद्ध करावे , पिंडदान तर्पण करावे ,काही वेळा आपली काहीही चूक नसताना उगाचच आपण कोर्ट केस मध्ये अडकतो, कोर्टाच्या पायर्यासारखा चढाव्या लागतात , केस काही केल्या संपतच नाही , काय करावे हेच सुचत नाही तर अशा वेळेस समजून जावे ही पूर्वजांची ही आपल्यावरील नाराजी आहे, म्हणून योग्य प्रकारे श्राद्ध तर्पण करून आपल्या पितरांना प्रसन्न करावे.

पितरांकडे आपल्या सुखी व समाधानी जीवनासाठी प्रार्थना करावी. या काही लक्षणांवरून आपल्या लक्षात येते की आपले पितर आपल्यावर प्रसन्न आहेत की नाराज. त्यांना जास्त प्रसन्न करण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम ठेवण्यासाठी त्यांचे विधीपूर्वक व्रत करावे.

जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी , त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्राप्त करावे. काही चुकले असेल तर त्याबद्दल क्षमा याचना करावी व त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि नेहमी नित्यनेमाने त्यांची सेवा करण्याचा संकल्प करावा.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *