पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाईन च्या दुर्घटनेचा व्हिडिओ आला समोर
23 मे ला लाहोर वरून निघालेले पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाईनचे पीके 8303 हे प्रवासी विमान कराची जीना इंटरनॅशनल एअरपोर्ट च्या शेजारी असलेल्या वस्तीमध्ये पडले.
या दुर्घटनेमध्ये 100 पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. लाहोर वरून कराचीला निघालेले हे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स विमान 91 प्रवाशांना घेऊन कराचीला निघाले होते.
कराची जीना इंटरनॅशनल एअरपोर्ट च्या जवळ आल्यानंतर विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाला.
पायलट लैंडिंग च्या प्रयत्नात असताना हे विमान एअरपोर्ट नजीकच्या बिल्डिंग वरती जाऊन आदळले.
पाकिस्तान मीडिया ने जारी केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये पायलटने इंजिनामध्ये बिघाड झाल्याचे नमूद केले होते.
तरीही या दुर्घटनेचा ठोस पुरावा भेटलेला नाही. हे संपूर्ण थरारक दृश्य काही अंतरावर असणाऱ्या बिल्डिंगच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले.
Post Comment