लाईफ स्टाईल

भांडुपच्या “एस” विभागांत ना भीती ना दहशत? कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 पार..

मुंबई महानगरपालिका एस विभाग क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज दिवसभरात कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे संपूर्ण एस विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1011 पर्यंत पोहोचला आहे. आज कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 234 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील 216 रुग्ण हे एस विभागाच्या बाहेरील आहेत.अशीही माहिती समोर आली आहे.

109 ,110,111, 112,113,114,115,116 या प्रभागातील मागील शनिवार पासून आतापर्यंत 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

प्रभाग क्रमांक 109,110,113,117,120,119 हे सर्वाधिक मागील आठवड्यातील कोरोना प्रभावित भाग आहेत. टेबेपाडा, व्हिलेज रोड, रामनगर रावते कंपाऊंड, तुळशेत पाडा , सोनापूर, दर्गा रोड,जमिल नगर, कोकण नगर, समर्थ नगर, गाढव नाका, रमाबाईनगर, सूर्यनगर , कन्नमवार नगर या विभागातून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चाळीतील लोक लॉकडाउनमध्येही रस्त्यावर फिरत आहेत.

कांजुरमार्ग पूर्व,कर्वेनगर,एम,एम,आर,डि,ए, इमारतीमधील,कोविड केअर सेंटर मधील बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेने
दक्षता घेणे गरजेचे आहे.

मनपा प्रशासन, व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा योग्य समन्वय नसल्याने रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असूनही त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

एस विभागात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या दररोज वाढत असून, सोमवारी 5 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी व अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी कशा प्रकारे सावधगिरी बाळगली पाहिजे असा विचार कोणी करत नसल्याने ,नेमके दुखणं कोणाचं आहे ? व मात करण्यासाठी भांडुपकर नागरिकांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे असे असताना, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आवाज उठवायला हवा.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close