ओझोनच्या थराचे छिद्र आश्चर्यकारक रित्या बंद झाले!
ओझोन म्हणजे तरी काय ?
१९९५ पासून युनोच्या पर्यावरण विभागाने १६ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्टीय ओझोन दिन म्हणून घोषित केला तेव्हापासून संम्पूर्ण जगात १६ सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. ओझोनचे रासायनिक सूत्र आहे O3 म्हणजेच ऑक्सिजनच्या तीन अणूपासून ओझोन चा एक रेणू बनतो. पृथ्वीच्या वातावरणाचे एकूण चार थर आहेत, त्यापैकी स्थितांबरापासून २५ ते ३० किलोमीटर च्या दरम्यान हा ओझोन चा थर आढळतो.
हे पण वाचा: मधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा!
मॉण्ट्रियल करार म्हणजे काय ?
१६ सप्टेंबर १९९५ ला युनोने हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून घोषित केल्यानंतर, जगातील वेगवेगळ्या देशांनी मिळून कॅनडा येथील मॉन्ट्रियल शहरात एक करार केला. यात काही निरबंध घातले गेले. या कराराद्वारे क्लोरोफ्लुरोकारबनच्या उत्पादनावर व वापरावर पूर्ण बंदी आणण्याची योजना आखली गेली. त्यामुळेच याचे परिणाम खूप समाधानकारक आहेत असं म्हटल जातं. तरी सुद्धा ओझोन थर पूर्ववत व्हायला २०५० पर्यंतचा कालावधी लागेल असं शास्त्रज्ञाचे मत आहे.
ओझोन कमी झाल्यास काय होईल ?
आपल्या शरीराला एका विशिष्ट तापमानाची सवय झालेली आहे . थोडा जरी उन्हाळा कडक झाला तर आपल्या शरीराची लाहीलाही होते. हे आपणास चांगलेच माहीत आहे. मग स्थितांबरीय स्तरातील ओझोनचा स्तर जर कमी झाला तर सूर्याची अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर येतील आणि त्यामुळे त्वचा विकार व त्वचेचे कॅन्सर यासारख्या महाभयानक आजारांना सामोरे जावे लागेल. शिवाय पिकांची उत्पादन क्षमताही नष्ट होईल.
ओझोनचे छिद्र कसे झाले बंद ?
मागील महिन्यात एक बातमी आली होती कि ओझोनच्या थराला पडले आहे मोठे छिद्र , ज्याने जागतिक तापमान वाढीचे संकेत दर्शविले होते. याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशीही जोडण्यात आला होता, पण नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार हे छिद्र आता पूर्णपणे बंद झाल्याचे समजते. काहींच्या मते हा कोरोनाचा प्रभाव आहे असं म्हटल जात आहे. कारण सध्या रस्त्यावरची वहातुक ठप्प झाल्याने वायू प्रदूषणात सुधारणा झाल्यामुळे हे छिद्र बंद झाल असावं.
पण शास्त्रज्ञानच्या मते हा केवळ योगायोग आहे. लॉक डाऊन मुळे कमी झालेल्या प्रदूषणाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. तर हे छिद्र बंद होण्याचं खरं कारण आहे स्ट्रॅटोस्फियर ( Stratosphere ) गरम झाल्यामुळे उत्तर ध्रुवावरील तापमान वाढू लागतं आणि स्ट्रॅटोस्फेरिक थर गरम होऊन ओझोन थर वाढू लागतो. अशाप्रकारे ओझोन थर वाढल्याने हे छिद्र बंद झाल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे .
हे पण वाचा: अमेरिका चीन नव्हे तर हा देश शक्तिशाली देश म्हणून पुढे येतो आहे.
तेव्हा मित्रांनो पर्यावरणाची काळजी घ्या. पर्यावरण प्रेमी बना आणि पर्यावरणाविषयी तुमच मत मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि अशा प्रकारची नवनवीन माहिती मिळविण्यासाठी कोकणशक्तिला फेसबुकवरती लाईक करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा.
Post Comment