Connect with us

क्रिडा

‘माही द ‘फिनिशर’ इज बॅक, धोनीला जुन्या अंदाजात पाहून क्रिकेटविश्वातून प्रतिक्रियांचा पाऊस

Published

on

[ad_1]

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील क्वालिफायर १ चा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ४ विकेट्सने विजय मिळवत नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा जुना आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे, क्रिकेटविश्वातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

या सामन्यात चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत चेन्नईला विक्रमी नवव्यांदा अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले. धोनी या सामन्यात चेन्नईला ११ चेंडूत २४ धावांची गरज असताना मैदानात आला होता. त्याने ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १८ धावा केल्या.

तत्पूर्वी दिल्लीने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने अर्धशतकं झळकावली होती. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारीही केली. उथप्पाने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर, ऋतुराजने ५० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. मोईन अलीने १६ धावांचे योगदान दिले.

चेन्नईच्या या विजयानंतर क्रिकेटविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्वीट केले की ‘आणि किंग परतला. क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर. माझ्या जागेवरुन त्याने मला उडी मारण्यास पुन्हा एकदा भाग पाडले.’

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत म्हटले की ‘फिनिशिंगची कला – एमएस धोनी स्टाईल. सामन्यातील परिपूर्ण क्षण. धोनी जेव्हा अशा प्रकारे सामना संपवतो, तेव्हा अनेक आठवणी ताज्या होतात.’

तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने ट्वीट केले की ‘माही हैं तो अभी भी मुमकिन हैं’

दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांनी ट्वीट करत म्हटले की ‘तो अजूनही सामना संपवतोय. गाथा सुरू आहे.’

व्यंकटेश प्रसादने ट्वीट केले की ‘दर्जा कायमस्परुपी असतो. धोनीकडून शानदार खेळी आणि चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम सामन्यात. एमएस धोनीच्या उपस्थितीत काहीत अशक्य नाही. मागील कठीण हंगामानंतर चेन्नई सुपर किंग्सचे सुरेख पुनरागमन.’

या व्यतिरिक्त देखील अनेकांनी धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दिल्लीकडून पंत, शॉची अर्धशतकं 
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि रिषभ पंतने अर्धशतकं केली. पंतबरोबर शिमरॉन हेटमायरने केलेली ८३ धावांची भागीदारीही महत्त्वाची ठरली.

शॉने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तसेच पंतने ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर हेटमायरने ३७ धावा केल्या. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

चेन्नई अंतिम सामन्यात, तर दिल्लीला आणखी एक संधी
चेन्नई संघ आता अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आता सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एलिमिनेटर सामना होणार आहे. यातील जो संघ सामना जिंकेल, तो मंगळवारी (१२ ऑक्टोबर) होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करेल. त्यातून जो संघ विजयी होईल, तो अंतिम सामन्यात चेन्नई विरुद्ध खेळले.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *