×

आरसीबीचा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला, पाहा ‘कॅप्टन’ कोहलीची अखेरच्या सामन्यानंतरची प्रतिक्रिया

आरसीबीचा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला, पाहा ‘कॅप्टन’ कोहलीची अखेरच्या सामन्यानंतरची प्रतिक्रिया

[ad_1]

शारजाह। कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी (११ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ विकेट्सने पराभूत केले. बेंगलोरच्या या पराभवामुळे त्यांचे आयपीएल २०२१ मधील आव्हानही संपुष्टात आले. याशिवाय बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा नेतृत्वपदाचा कार्यकाळही संपला. विराटने मागील महिन्यातच जाहीर केले होते की हा त्याचा आरसीबीचा कर्णधार म्हणून अखेरचा हंगाम असेल.

विराटसाठी बेंगलोरच्या पराभवामुळे कर्णधारपदाचा शेवट निराशाजनक राहिला. पण, असे असले तरी विराटने सामन्यानंतर त्याच्या कर्णधारपदाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की त्याने संघासाठी त्याचे सर्वोत्तम दिले.

‘संघासाठी माझे सर्वोत्तम दिले’
विराट सामन्यानंतर त्याच्या कर्णधारपदाच्या प्रवासाबद्दल म्हणाला, ‘मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जिथे युवा खेळाडू येऊ शकतात आणि स्वातंत्रपणे आणि विश्वासाने खेळू शकतात. ही गोष्ट मी भारतीय संघाबाबतही केली. मी माझे सर्वोत्तम दिले. मला माहित नाही प्रतिसाद कसा मिळाला, पण मी प्रत्येकवेळी संघासाठी १२० टक्के माझे सर्वोत्तम दिले आणि यापुढेही एक खेळाडू म्हणून मी देत राहिल.’

तो भविष्याबद्दल बोलताना म्हणाला, ‘पुढच्या तीन वर्षांसाठी आता पुन्हा संघ एकत्र करण्याची आणि संघाची पुर्नबांधणी करण्यासाठी ही एक उत्तम वेळ आहे.’

त्याबरोबर पुढेही आरसीबीसोबतच कायम राहाणार असल्याचे सांगताना विराट म्हणाला, ‘हो नक्कीच, मी स्वत:ला दुसऱ्या संघात खेळताना पाहात नाही. भौतिक सुखांपेक्षा निष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आयपीएलमधील माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत मी आरसीबी संघातच असेल.’

विराटची कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने आत्तापर्यंत १४० आयपीएल सामन्यांत बेंगलोरचे नेतृत्व केले असून ६६ सामन्यांत विजय मिळवले आहेत. तसेच ७० सामन्यांत पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर ४ सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.

त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ साली आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना सनरायझर्स हैदराबाकडून पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

ट्रॉफीचे अखेर स्वप्नच राहिले! नकोश्या विक्रमासह कोहलीच्या नेतृत्व कारकिर्दीची अखेर

विराटचा आरसीबीच्या कर्णधारपदाला ‘गुडबाय’; १४० सामन्यांत नेतृत्व करताना ‘अशी’ राहिली कामगिरी

नेहमीच आरसीबीचा कर्दनकाळ ठरतो नरीन; बनला अशी कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय गोलंदाज

[ad_2]

Post Comment