Connect with us

क्रिडा

असा पराक्रम करणारा कोलकाता हा एकमेव संघ आहे. चेन्नईसाठी विजेतेपदा जिंकण तितकेसे सोपे नाही!

Published

on

[ad_1]

इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ मिळाले आहेत. पहिला क्वालिफायर जिंकत चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांचे अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले होते. त्यांच्यानंतर आता कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला ३ विकेट्सने चितपत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शुक्रवार रोजी (१५ ऑक्टोबर) चेन्नई आणि कोलकाता यांच्यात अंतिम सामन्याची लढत रंगेल.

हा सामना जिंकत ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई संघ चौथा चषक आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर कोलकाता संघ त्यांची मागील ७ वर्षांची प्रतिक्षा संपवत तिसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. परंतु उभय संघांसाठी हा अंतिम सामना अतिशय आव्हानात्मक असणार आहे. त्यातही आकडेवारीचा कल कोलकाताच्या बाजूने असल्याने चेन्नईचे जेतेपदाचे स्वप्न कठीण दिसते आहे.

दुबईच्या मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात ऑयन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता आणि एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ आमने सामने असतील. आतापर्यंत चेन्नईने ८ वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. परंतु त्यापैकी केवळ ३ वेळा त्यांच्या नशीबी विजय आला आहे; तर तब्बल ५ वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. मात्र कोलकाता संघाने जेव्हा जेव्हा अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी विजय संपादनच केले आहे.

२०१२ मध्ये कोलकाता संघ पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला होता. यावेळी त्यांचा सामना चेन्नई संघाशी झाला होता. या सामन्यात त्यांनी चेन्नईला ५ विकेट्सने धोबीपछाड देत पहिलेवहिले जेतेपद पटकावले होते. त्यानंतर पुन्हा २०१४ मध्ये त्यांनी अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला होता. या सामन्यातही त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबला ३ विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. विशेष म्हणजे, त्यांनी हे दोन्हीही सामने शेवटच्या षटकात जिंकले होते.

त्यामुळे यंदाही चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात हा संघ बाजी मारतो की काय? याची उस्तुकता चाहत्यांना लागली आहे.

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *