Connect with us

ब्लॉग

लॉकडाऊन मध्ये गावी कसे जाता येईल, जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Published

on

epass

लोकडाऊन 3 मध्ये काही प्रमाणात शितलता दिल्याने जास्तीत जास्त लोक शहर सोडून गावाची वाट धरताना दिसले. लोकडाऊन 3 सरकारने गावी जाण्याचे उपलब्ध पर्याय सांगितले, परंतु बऱ्याच लोकांमध्ये याबाबत शंका दिसून आल्या.

नक्की कोणती प्रक्रिया आहे, कोण कोणते कागदपत्रे जोडावित या सर्वाबद्द्ल अनेद संभ्रम लोकांमध्ये दिसून आले आहेत.

आपातकालीन परिस्थितीमध्ये तुम्ही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर रितसर प्रवास करु शकता पण त्याआधी तुम्हला महाराष्ट्र पोलिस विभागाची परवानगी घेणे अनिर्वाय आहे.

महाराष्ट्र पोलिस विभागाची परवानगी कशी घ्यावी?

महाराष्ट्र पोलिस विभागाची परवानगी घेण्यासाठी तुम्हाला Online अर्ज करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागेल.

Online अर्ज करण्यापूर्वी या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • फोटो

सर्वप्रथम तुम्हाला वैद्यकीय प्रमापत्र घ्याव लागेल. ते घयाण्यासाठी जवळील किंवा फॅमिली डॉक्टर कडून तपासून तुम्ही घेऊ शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवास करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असणे आवश्यक असणार आहे. म्हणूनच कोणतीही गोष्ट वैदकीय प्रमाणपत्र घेताना डॉक्टर पासून लपवू नका.

हे करा :

  • अर्ज केवळ इंग्रजीतून भरावा.
  • सर्व कागदपत्रे एका फाइलमध्ये एकत्र करा.
  • प्रवास करताना पासची हार्ड/सॉफ्ट कॉपी जवळ ठेवावी.

हे करू नका :

  • पाससाठी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज करू नका.
  • TOKEN ID सेव्ह करायला विसरू नका.
  • अधिकृतते शिवाय / वैधते पलीकडे पास वापरू नका.

दमा, अस्थमा, टी. बी. याआजारावर कडकनाथचे चिकन अतिशय गुणकारी हे पण वाचा.

Advertisement
Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2021 Kokanshakti. Theme by MVP Themes, powered by WordPress.