आरोग्यब्लॉग

कडकनाथ… एकदम कडक!

दमा, अस्थमा, टी. बी. याआजारावर कडकनाथचे चिकन अतिशय गुणकारी

कडकनाथ हे नाव आपण ऐकले असेलच. या विषयी बरीच माहितीही  विविध माध्यमांतून वाचली असेल  ऐकली असेल. हीआहे एक विशिष्ट प्रकारच्या कोंबडीची प्रजात. कडकनाथ या नावाप्रमाणेच एकदम कडक. या प्रकारच्या कोंबडीची प्रजात मध्यप्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यातलीआहे.

कालामासी या नावाने सुद्धा या प्रजातीला ओळखले जाते. कडकनाथ प्रजातीच्या कोंबडीचे मांस, हाडे रक्त अगदी सगळे काही काळे असते. संपूर्ण कोंबडीच चोचीपासून ते पायापर्यंत संपूर्ण काळी असते. 

मध्यप्रदेश प्रमाणेच गुजरात राजस्थान जिल्ह्यांमध्येही या प्रजातीच्या कोंबड्या आढळतात. बहुतांश करून आदिवासी समाज या कोंबड्याचे पालन जास्त प्रमाणात करतात. आदिवासी समाजात हा पक्षी पवित्र समजला जातो. दिवाळी नंतर या पक्ष्याला देवासाठी बळी देतात. 

कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्य –

औषधी गुणधर्म

या प्रकारच्या कोंबड्यांमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असते. कडकनाथ कोंबड्याच्या  मासांमध्ये व अंड्यामध्ये जीवनसत्व बी १, बी २, बी ६, बी १२ तसेच प्रथिने कॅल्शिअम फॉसफरस  लोह यांचे ही  प्रमाण पुरेसे असते.

त्यामुळे या कोंबडीचे मांस खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढत नाही. उच्चरक्त दाब वाल्यांनाही याकोंबडीचे मांस खाणे फायदेशीर ठरते.

अंडी –  

कडकनाथ  कोंबडीचे  एक  अंडे साधारणता  सत्तर रुपयाला  विकले जाते. कडकनाथाची अंडी दमा, तीव्र डोकेदुखी, मूत्रपिंडावर आलेली सूज  या आजारांवर अत्यन्त गुणकारी आहेत.

उच्चं रक्तदाब असणाऱ्या  व  वयस्कर व्यक्तींना ही  अंडी खूप पौष्टिक आहेत. कडकनाथ प्रजातीची कोंबडी वर्षाकाठी  १००  ते  १२० अंडी  देतात .  

चिकन – 

कडकनाथ  कोंबडीचे  चिकन  साधारपणे  नऊशे  ते  एक हजार रुपये दराने  विकले जाते. कडकनाथकोंबडीच्या माणसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने हे चिकन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

कडकनाथ कोंबडीचे फायदे – 

  • कडकनाथ कोंबडीचे  चिकन  खाल्ल्यामुळे  हार्ट अटॅक येत  नाही. 
  • दमा, अस्थमा, टी. बी. याआजारावर कडकनाथचे चिकन अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते.
  • माणसाच्या शरीराच्या वाढीस आवश्यक असलेले जीवनसत्वे, कैल्शिअम फॉसफरस, आयर्न इत्यादी  सर्व घटक कडकनाथाच्या चिकन मध्ये असतात.
  • कडकनाथचे चिकन खाल्ल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
  • शरीरातील चरबीचे प्रमाण कमी  करण्यासठी कडकनाथचे चिकन खाणे फायदेशीर ठरते.
  • कडकनाथ कोंबडीचे चिकन व अंडी खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते परिणामी शरीरातील शुगरचे प्रमाण संतुलित रहाते.
  • मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कडकनाथचे चिकन खाल्ल्यास मधुमेह बरा  होतो.
  • बंगलोरच्या प्रयोगशाळेत कडकनाथच्या अंड्यावर संशोधन करण्यात आले असून या अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ह्या अंड्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत हे सिद्ध झाले आहे.

एकंदरीत कडकनाथ प्रजातीची कोंबडी  सध्यातरी ठराविक भागातच पाळत असल्याने दुर्मिळच आहेत. सध्या शासन लघुउद्योगांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे.

तेव्हा देशातील जास्तीत जास्त तरुणांनी कुक्कुट पालनामध्ये कडकनाथ प्रजातीच्या कोंबडीचे पालन करून देशातील या प्रजातीच्या  कोंबडीचे प्रमाण वाढवावे. 

जेणे करून बॉयलऱ  कोंबडीचे चिकन खाऊन विविध आजारांना सामोरे जाण्यापेक्षा  कडकनाथचे चिकन खाऊन आजारांना दूर ठेऊया.      

Tags
Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close