Connect with us

देश

एकाच वेळी देशाचे लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुख मराठी

Published

on

[ad_1]

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षणाची धुरा मराठी खांद्यावर असणार आहे. कारण संरक्षण दलाच्या तीन प्रमुख दलांपैकी दोन दलांचे प्रमुख एकाच वेळी मराठी व्यक्ती असणार आहेत. एअर चीफ मार्शल विजय चौधरी यांनी आज देशाचे नवे हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर हा अनोखा योग जुळून आला आहे. कारण सध्या लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे हे काम पाहत आहेत.

 एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदोरिया आज वायुदल प्रमुख पदाहून सेवानिवृत्त झाले असून एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारली. एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले. 29 डिसेंबर 1982 रोजी ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले .त्यांनी यापूर्वी वायुदलाचे उपप्रमुख तसेच वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. 

वायुदलात त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा 3800 तासांचा त्यांना अनुभव आहे. वायुदलाने राबविलेल्या सियाचीन येथील ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि कारगिल युध्दातील ‘ऑपरेशन सफेद सागर’ या मोहिमांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदक, विशिष्ट पदक, 2015 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि 2021 मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.                

[ad_2]

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *