Connect with us

देश

खुशखबर! आता फक्त 633 रुपयांना मिळणार सिलिंडर गॅस

Published

on

Lpg Gas Cylinder : नव्याने गॅस सिलेंडर बुक करणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सिलिंडर आता स्वस्तात मिळणार आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे. यामध्ये गॅस सिलिंडर स्वस्तात म्हणजेच फक्त 633 रुपयांमध्ये मिळणार आहे. 

सध्या देशात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत इंडेन कंपनी फक्त 633 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देत आहे.  इंडेनने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कंपोझिट सिलिंडर आणले आहे. हा सिलिंडर फक्त 633.5 रुपयांत येत आहे. शिवाय हे सिलिंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवणे शक्य आहे.  

कंपोझिट सिलेंडर वजनाने हलके आहेत आणि त्यात 10 किलो गॅस मिळणार आहे.  त्यामुळेच या सिलिंडरची किंमत कमी आहे. 

“हा सिलिंडर सध्या 28 शहरांमध्ये उपलब्ध आहे. परंतु तो लवकरच सर्व शहरांमध्ये उपलब्ध होईल. IOCL च्या वेबसाइटनुसार, या सिलिंडरची मुंबईत किंमत 634 रुपये, कोलकात्यात 652 रुपये, चेन्नईमध्ये 645 रुपये, लखनऊमध्ये 660 रुपये, इंदूरमध्ये 653 रुपये, भोपाळमध्ये 638 रुपये आहे  तर गोरखपूरमध्ये 677 रुपये किंमत असल्याची माहिती इंडियन ऑइलने दिली आहे. 

जानेवारी महिन्यात 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये, कोलकात्यात 926 रुपये, मुंबईत 899.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 915.5 रुपये आहे.

Advertisement
Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2021 Kokanshakti. Theme by MVP Themes, powered by WordPress.