पाकिस्तानच्या परावभवांतर का बलुचिस्तानी ‘जश्न’ करता आहेत, पाहा व्हिडिओ
[ad_1]
मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या (T 20 World Cup 2021) दुसरा सेमी फायनल सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) यांच्याच खेळवण्यात आला. या रंगतदार सामन्यात मोक्याच्या क्षणी मॅथ्यू वेडने (matthew wade) फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात धडक मारली. तर सलग 5 सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं. (t 20 world cup 2021 semi final 2 baluchistan people celebration after australia defeat pakistan)
पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतासह विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. पाकिस्तानच्या या पराभवाचं बलूचिस्तानमधील लोकांनी डान्स करत जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एएनआयने शेअर केलेल्या व्हीडिओत, काही क्रिकेटप्रेमी एकत्र एका खोलीत पाहून मॅच पाहताना दिसतायेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने विजयी फटका माराताच या क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तानच्या पराभवाचं सेलिब्रेशन केलं.
पाकिस्तानचा पराभव झाल्याने बलूचिस्तानमधील लोकांच्या आनंदाचा पारावा राहिला नाही. या व्हीडिओत बलूचमधील नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. तसेच नाचतानाही दिसत आहेत.
बलोच राष्ट्रीय चळवळीबद्दल थोडक्यात
बलूचिस्तान पाकिस्तानमधील एक भाग आहे. क्वेटा ही बलूचिस्तानची राजधानी आहे. बलूचिस्तानमधील नागरिक पाकिस्तानकडे स्वांत्र्याची मागणी करत आले आहेत. तेथील नागरिक बलोच राष्ट्रीय चळवळ या नावाने आंदोलन करत आहेत. पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळावं, बलूचिस्तानचं उद्देश आहे.
या आंदोलनाला मोडित काढण्यासाठी पाकिस्तानच्या सेनेने वेळोवेळी अत्याचार केले आहेत. पाककडून करण्यात येणाऱ्या हल्ल्याचं बलूचिस्ताननेही जशास तसं उत्तर दिलं आहे. बलूचिस्ताननेही पाकिस्तानवर हल्ले केले आहेत. नुकतच चिनी इंजिनियर्सच्या बसमध्ये धमाका झाला होता. या धमाक्याचं कनेक्शनही बलूचिस्तानशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं.
[ad_2]
Post Comment