भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’
[ad_1]
रविवार रोजी (३१ ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ब्लॉकब्लास्टर सामना रंगणार आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मधील आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झालेले हे संघ विजयाच्या शोधात आहेत. बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघाने सुरुवातीला भारत आणि त्यानंतर न्यूझीलंडला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभूत केले आहे. त्यामुळे हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी उभय संघ झगडताना दिसतील.
न्यूझीलंडचे विश्वचषकातील भारताविरुद्धचे आकडे अतिशय शानदार आहेत. दुसरीकडे भारताला गेल्या १९ वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. अशात भारतीय संघ आपल्या सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंसह मैदानावर उतरण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंडही भारताविरुद्धची आपली विजयाची मालिका पुढे सुरू ठेवण्यासाठी तगड्या प्लेइंग इलेव्हनची निवड करेल.
तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी भारत आणि न्यूझीलंड संघातील उत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत, ज्यांच्यावर तुम्ही ड्रीम ११ मध्ये डाव लावू शकता.
सामन्याविषयी अधिक माहिती-
सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, सामना २८, सुपर १२ गट २
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
तारीख आणि वेळ: ३१ ऑक्टोबर, सामना संध्याकाळी ७.३० आणि नाणेफेक ७.०० वाजता
लाईव्ह स्ट्रिमींग: स्टार स्पोर्ट्स नेटकवर्क आणि डिज्नी+हॉटस्टार
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विलियम्सन (कर्णधार), जिम्मी नीशम, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, टिम सिफर्ट, ऍडम मिल्ने, इश सोधी, ट्रेंट बोल्ट, टिम साउदी
ड्रीम ११ संघ-
फलंदाज – केएल राहुल, रोहित शर्मा, केन विलियम्सन, मार्टिन गप्टिल
अष्टपैलू – शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, जिम्मी नीशम
गोलंदाज – ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, ईश सोधी
यष्टिरक्षक – रिषभ पंत
कर्णधार आणि उपकर्णधार – केएल राहुल / मार्टिन गप्टिल
[ad_2]
Post Comment