IPL 2021: lफायनलनंतर संघ अन् खेळाडूंवर पैशांचा पाऊस, पुरस्कार विजेत्यांची बक्षीस रक्कम वाचून व्हाल थक्क
[ad_1]
दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगता झाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी विजय मिळवला आणि चौथ्यांना आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या सामन्यानंतर पुरस्कार वितरण संमारंभ पार पडला. यावेळी पुरस्कार विजेत्या संघांना आणि खेळाडूंना मोठी बक्षीस रक्कमही देण्यात आली.
अंतिम सामन्यात विजेतेपद मिळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला सर्वाधिक २० कोटींचे बक्षीस मिळाले. तर, उपविजेत्या ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला १२.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. याशिवाय प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेले अन्य दोन संघ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ८.७५ कोटींचे बक्षीस मिळाले.
याशिवाय अनेक खेळाडूंनीही यंदा विविध पुरस्कार मिळवले. त्यामुळे त्यांना मोठी रक्कम बक्षीस स्वरुपात मिळाली आहे. यंदा पुरस्कार विजेत्यांनी किती बक्षीस रक्कम मिळाली हे जाणून घेऊ या.
आयपीएल २०२१ चे पुरस्कार
विजेते- चेन्नई सुपर किंग्स – २० कोटी रुपये
उपविजेते- कोलकाता नाईट रायडर्स – १२.५ कोटी रुपये
क्वालिफायर २ मध्ये पराभूत संघ – दिल्ली कॅपिटल्स – ८.७५ कोटी रुपये
एलिमिनेटरमध्ये पराभूत संघ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – ८.७५ कोटी रुपये
अंतिम सामन्यातील सामनावीर- फाफ डू प्लेसिस, चेन्नई सुपर किंग्स – ५ लाख रुपये
ऑरेंज कॅप- ऋतुराज गायकवाड (६३५ धावा), चेन्नई सुपर किंग्स – १० लाख रुपये
पर्पल कॅप- हर्षल पटेल (३२ विकेट्स), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १० लाख रुपये
सर्वाधिक षटकार – केएल राहुल (३० षटकार), पंजाब किंग्स – १० लाख रुपये
एमर्जिंग प्लेअर- ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्स – १० लाख रुपये
सर्वोत्तम झेल – रवी बिश्नोई (सामना २१, फलंदाज – सुनील नारायण), पंजाब किंग्स – १० लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सिजन – शिमरॉन हेटमायर, दिल्ली कॅपिटल्स – १० लाख रुपये
गेम चेंजर – हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १० लाख रुपये
पॉवर प्लेअर – व्यंकटेश अय्यर, कोलकाता नाईट रायडर्स – १० लाख रुपये
व्यॅल्युएबल प्लेअर- हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १० लाख रुपये
फेअर प्ले अवॉर्ड- राजस्थान रॉयल्स – १० लाख रुपये
[ad_2]
Post Comment