×

71च्या युद्धतील ऐतिहासिक ठेवा कचऱ्यात उभा, महापराक्रमी ‘वैजयंता’ रणगाड्याची अवहेलना

71च्या युद्धतील ऐतिहासिक ठेवा कचऱ्यात उभा, महापराक्रमी ‘वैजयंता’ रणगाड्याची अवहेलना

[ad_1]

1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजविणारा “वैजंयता” रणगाडा शहीद मनीष पितांबर यांच्या स्मरणार्थ मुंब्रा स्टेशन जवळच असलेल्या मोकळ्या जागेत बसविण्यात आला होता. मात्र आज तोच महापराक्रमी रणगाडा कळव्याच्या रेतीबंदर जवळ कचऱ्यात ठेवण्यात आला आहे. रंगरंगोटीसाठी काढण्यात आलेल्या रणगाडा आजपर्यंत पुन्हा बसविण्यात आला नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने बसविण्यात आलेल्या या रणगाड्याची आज अक्षरशः दुर्दशा झाली आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही.
[ad_2]

Post Comment