Connect with us

देश

15 हजारांहून कमी पगार असणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; फक्त करा एकच काम

Published

on

Ayushman Bharat Scheme : जर तुम्ही असंगठिक कामगार असाल आणि तुमचं मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांहून कमी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही ई-श्रम पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता. यामुळे  कोणतीही दुर्घटना आणि आजारपणादरम्यान येणाऱ्या खर्चाच्या चिंतेपासून मुक्त होऊ शकता. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास कामगारांना दोन लाखांचा विमा मिळणार आहे. तसेच कुटुंबासाठी वार्षिक 5 लाखांपर्यंतचं आरोग्य सुरक्षा कवच देणाऱ्या आयुषमान योजनेतही समावेश होतो. तसेच, आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी मदतही उपलब्ध होईल.

कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाइन नंबर 14434 वर संपर्क साधू सकता. तसेच www.gms.eshram.gov.in पोर्टल मार्फत कोणतीही तक्रार दाखल करु शकता. असंघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार, घर काम करणारे कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, स्थलांतरित आणि प्लॅटफॉर्म कामगार, कृषी कामगार, मनरेगा कामगार इत्यादींचा समावेश होतो. परंतु, यांचं मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांहून कमी असणं गरजेचं आहे. 

कशी कराल नोंदणी? 

जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाला लिंक असेल, तर तुम्ही स्वतः नोंदणी करु शकता. यासाठी ई-श्रम पोर्टल www.eshram.gov.in वर भेट द्यावी लागेल. तसेच ज्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांना नोंदणी करण्यासाठी सीएससीला जावं लागेल. अशा कामगारांची नोंदणी बायोमॅट्रिक पद्धतीनं केली जाईल. ई-श्रम कार्डाला सीएससीकडून कागदावर प्रिंट करुन कामगारांना दिलं जाईल. तसेच इथे नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. 

कोण करु शकतं नोंदणी? 

  • असे कामगार, ज्यांचं वय 16 ते 59 वर्षे आहे आणि कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था (EPFO) किंवा राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) जे या सुविधांचे लाभार्थी नाहीत. 
  • असे कामगार, जे आयकर भरण्यासाठी पात्र नाहीत. 
  • असे कामगार, जे सरकारी कर्मचारी नाहीत. 

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *