देश
New Packaging Rules : दूध, चहा, बिस्कीटांसोबत एकूण 19 वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी नवे नियम, जाणून घ्या…
[ad_1]
दैनंदिन वापरातल्या दूध, चहा पावडर, बिस्कीट, खाद्यतेल, पीठ, पाण्याची बाटली, डाळ, ब्रेडसारख्या पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी नवी नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार निर्मिती कंपन्यांना एमआरपीसोबतच वस्तूचे प्रति युनिट किंवा प्रति किलोनुसार दरही द्यावा लागणार आहे.
दूध, चहा, बिस्कीट, खाद्यतेलासह 19 वस्तूंच्या पॅकेजिंगवेळी ही खबरदारी घ्यावी लागणार आहे. आयात केलेल्या वस्तूंवरही मॅन्युफॅक्चरिंग ईयर म्हणजेच उत्पादनाचं वर्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपण खरेदी करणारी वस्तू कधी बनलीय आणि त्याची नेमकी किती किंमत झालीए, याची माहिती मिळेली आहे. 1 एप्रिल 2022 पासून नवे नियम लागू होतील.
[ad_2]
