Chhava Teaser : ‘शिवा गया लेकिन…’, हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही
Vicky Kaushal Chhava Teaser : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा त्याचा आगामी चित्रपट ‘छावा’ मुळे चर्चेत होता. काल त्यानं एक पोस्ट शेअर करत 19 ऑगस्ट रोजी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले. आता अखेर सगळ्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे असं म्हणता येईल. कारण चित्रपटाचा जबरदस्त असा टीझर प्रदर्शित झाला आहे. विकीनं सोशल मीडियावर नुकताच हा टीझर शेअर केला आहे.
विकीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या सुरुवातीला मराठा आणि मुघलांमध्ये युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची एन्ट्री… आणि त्यानंतर त्यांनी ती लढाई कशी लढई हे दाखवलं. त्यात एक डायलॉग असून त्यात म्हटलं आहे की ‘छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ म्हणतात आणि वाघाच्या बछड्याला छावा म्हणतात.’ एकीकडे छत्रपती संभाजी महाराजा हे मुघलांशी युद्ध करत असतात तर दुसरीकडे औरंगजेब दाखवला आहे. यावेळी औरंगजेब म्हणाला की ‘शिवा गेला पण त्याचा विचार सोडून गेला.’
दरम्यान, विकीच्या या चित्रपटाच्या टिझरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच प्रतिक्रिया देत आहेत. भूमि पेडनेकर कमेंट करत विकीच्या अभिनयाची स्तुती करत म्हणाली, असं काही आहे का जे तू करु शकत नाही. अप्रतिम. हुमा कुरेशीनं कमेंट करत अरे व्वा असं म्हणतं फायर इमोटीकॉन वापरलं आहे. अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत विकी आणि या टीझरची स्तुती केली आहे.
हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसू बाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्याशिवाय अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर त्यांच्याशिवाय मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर याची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे. खरंतर ‘स्त्री 2’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा थिएटरमध्ये हा टीझर दाखवण्यात आला होता.
Post Comment