तीन शब्दात, मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांना बीसीसीआयने सुनावलं
टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी पाकिस्तानने टी२० विश्वचषकात भारताला एकदाही पराभूत केले नव्हते, मात्र यावर्षी त्यांनी भारताचा हा विक्रम मोडीत काढला. पराभवानंतर भारतीय चाहते सोशल मीडियावर चांगलेच भडकलेले दिसले. अशातच काही लोकांनी मोहम्मद शमीला त्याच्या जातीच्या आधारावर ट्रोल केले. त्यानंतर आता ४८ तासांनी बासीसीआयने शमीच्या समर्थनार्थ एक छोटेसे ट्वीट केले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले होते आणि सामन्यात त्यांना एकही विकेट मिळवला आला नव्हता. त्यातही सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधित ४३ धावा दिल्या होत्या, ज्यामुळे त्याला ट्रोल केले गेले. शमीने या सामन्यात त्याच्या ३.५ षटकांमध्ये ११.२० च्या इकोनॉमीने या धावा दिल्या होत्या. शमीला त्याच्या या खराब प्रदर्शनामुळे ट्रोल केले गेल्यावर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी त्याच्या समर्थनार्थ ट्वीट केले. पण बीसीसीआयने त्याचे समर्थन करण्यासाठी ४८ तासांचा वेळ घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात असताना, चाहते बीसीसीआयचे त्याच्या समर्थनातील ट्वीट पाहण्यासाठी बाट बघत होते. चाहत्यांना अपेक्षा होती बीसीसीआय शमीच्या बाजूने तत्काळ आणि मजबूतीने उभे राहील, पण तसे झाल्याचे दिसत नाही. बीसीसीआयने घटनेच्या ४८ तासानंतर केवळ पाच शब्दाचे ट्वीट केले आणि शमीचे समर्थन केले आहे.
बीसीसीआयने मोहम्मद शमीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत कर्णधार विराट कोहली दिसत आहे. ट्वीटमध्ये बोर्डाने, ‘गर्व, मजबूत, समोर आणि वर,’ असे पाच शब्द लिहिले आहेत. सोबतच भारताच्या झेंड्याची इमोजीही टाकली आहे. ट्वीटमधून बीसीसीआयने असा संदेश दिला आहे की, शमीवर गर्व आहे आणि संघ मजबूतीने पुढे जात आहे.
बीसीसीआयबरोबरच शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले गेल्यावर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज त्याचे समर्थन करण्यासाठी समोर आले आहेत. यामध्ये सचिन तेंडूलकर, इरफान पठाण, विरेद्र सेहवाग अशा नावांचा समावेश आहे.
Post Comment