फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनपेक्षा खूप स्वस्तात प्रोडक्टस विकतय ‘हे’ सरकारी पोर्टल, लगेच डिटेल्स पाहा
नवी दिल्ली: भारतात, तुम्हाला Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स साइट्सवर अतिशय वाजवी दरात उत्पादने मिळतात आणि म्हणूनच या साईट्स अनेक वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. यावर तुम्ही सहजपणे उत्पादने शोधू शकता आणि तुमच्या घरी मागवू शकता. यासाठी तुम्हाला खूप कमी रक्कम मोजावी लागते. पण, एखाद्या सरकारी पोर्टलवर देखील Amazon आणि Flipkart पेक्षा कमी किमतीत वस्तू मिळू शकतात. याचा तुम्ही कदाचित विचार केला नसेल. पण, हे अगदी खरे आहे. कारण, असे एक सरकारी पोर्टल आहे जे मोठ्या सवलतींसह उत्पादने विकत आहे. शिवाय, यात उत्पादनांच्या गुणवत्तेकडे देखील विशेष लक्ष देण्यात येते.
GeM नावाचे एक सरकारी मार्केट प्लेस आहे. जे, इतर ई-कॉमर्स साइटपेक्षा कमी किमतीत उत्तम दर्जाच्या उत्पादनांची विक्री करते . येथे तुम्हाला केवळ उत्पादनांची मोठी श्रेणी मिळत नाही, तर त्यांची किंमतही इतर ई-कॉमर्स साइट्सपेक्षा कमी असते.
हे मार्केट प्लेस अजूनही अनेक लोकांना माहित नाही. आज आम्ही तुम्हाला याच पोर्टलबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, २०२११-२२ मध्ये झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात अशी १० उत्पादने समोर आली आहेत. जी, या सरकारी पोर्टलवर इतर ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली . येथे कमी किंमतीचा अर्थ उत्पादनांच्या गुणवत्तेत तडजोड असा अजिबात नाही. ज्या उत्पादनांची किंमत कमी आहे ती उत्तम दर्जाची उत्पादने आहेत.
एकूण २२ उत्पादनांमध्ये तुलना करण्यात आली . ज्यात या पोर्टलवरील उत्पादने तसेच इतर ई-कॉमर्स साइटवरील उत्पादनांचा समावेश होता. या १० उत्पादनांमध्ये इतर साईट्सच्या तुलनेत ९.५ टक्के किमतीचा फरक आढळला. हा नक्कीच एक मोठा फरक आहे. ग्राहकांनी या पोर्टलवरून उत्पादने खरेदी केली तर त्यांना खूप फायदा होईल. बहुतेक लोकांना या सरकारी e-marketplace बद्दल माहिती नाही, त्यामुळे ते इतर ई-कॉमर्स साइटला भेट देऊन ही उत्पादने खरेदी करतात.
Post Comment