जगभटकंती

सलग तीन वेळा भारताला लूटणारा वास्को-द-गामा!

युरोप मधून समुद्र मार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी वास्को-द-गामा. ज्याने भारतातील समुद्र मार्गांचाही  शोध लावला. समुद्र मार्गाचा शोध ही  त्याकाळातील इतिहासातील महत्व पूर्ण घटना ठरली. कारण त्याकाळी भारत देश हा सोन्याचा धूर निघणारा देश होता. 

जीवनपरिचय – 

वास्को-द-गामा च्या  सुरुवातीच्या जीवनाबद्दल इतिहासात फार थोडी माहिती मिळते. वास्को-द-गामाचा जन्म पोर्तुगाल मधील समुद्र किनारी असलेल्या इलेन्सस किल्ल्याच्या किल्लेदारापोटी इ.स. १४६० मध्ये  झाला. 

वास्को-द-गामाचे वडील सुद्धा एक उत्तम खलाशी होते. वास्को-द-गामाला गणित विषयाची विशेष आवड होती. तसेच नौका परिवहन विषयाचाही  त्यांनी अभ्यास केला होता.

१४९२ मध्ये  पोर्तुगाल च्या राजाने फ्रान्सने समुद्रमार्गे केलेल्या  हल्ल्याच्या बदल्यात फ्रान्सची जहाजे ताब्यात  घेण्याचे काम वास्को-द-गामा वर सोपविले. यात वास्को-द-गामा यशस्वीही झाला. 

यामुळेच समुद्रमार्गे आशिया खन्डा चा शोध लावण्याचे काम वास्को-द-गामावर सोपविण्यात आले. यावेळी त्याने आफ्रिकेच्या किनाऱ्यावर एक प्रचंड जहाज पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने आपल्या  नोकराला त्याची माहिती काढण्यास सांगितली त्यावेळी ते जहाज भारताचे असल्याचे समजले आणि त्या वरूनच तो भारतात आल्याचे इतिहासात समजते. 

वास्को-द-गामाला रोजनिशी लिहिण्याची सवय होती त्यात त्याने या विषयीची नोंद केलेली आहे. भारतीय व्यापारी त्याकाळी मसाल्याचे पदार्थ, तलम रेशीम कापड, सुगंधी अत्तर, हिरे, हस्तिदंत, सोने चांदी इ. मौल्यवान  वस्तू जहाजाने घेऊन युरोप, आफ्रिका देशी जायचे.

असेच एक गुजराती व्यापारी कांजी मलम यांच्या जहाजा वरील चौकशी अन्ती  त्यांच्या जहाजा मागोमाग वास्को-द-गामा भारतात आल्याचे म्हटले जाते. 

वास्को- द- गामाची पहिली समुद्र यात्रा –

इ.स.८ जुलै  १४९७ मध्ये सोबत  चार  जहाजे घेऊन वास्को-द-गामा समुद्र  प्रवासासाठी निघाला . त्यावेळी त्याच्याकडे  १२० टन वजनाची  दोन जहाजे होती. तर ५० टन वजनाचे अतिशय वेगाने  पळणारे एक जहाज होते.

या शिवाय सर्व अवजड सामान वाहून नेणारे २०० टन वजनाचे एक  जहाज होते. दहा हजार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी त्यांना तीन महिने लागले. या प्रवासा दरम्यान त्यांच्या सोबत दोन दुभाषी सुद्धा होते.

आपल्या पहिल्या समुद्र प्रवासी यात्रे मध्ये वास्को-द-गामा  पंधरा जुलैला केनरी बेटावर पोहचला. सव्वीस जुलैला त्यांचा ताफा केपवर्गे बेटावर पोहचला. तिथून ते सात नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या हैलेना खाडीपर्यंत पोहचले.

तेथे  ते केफ ऑफ गुड होफला ते काही दिवस थांबले. ११ जानेवारी  १४९८ ला ते नटाल च्या  किनारी  पोहचले.  तिथे त्याने नटाल व मोजांबिकच्या दरम्यान असलेल्या छोट्याश्या नदीला रियो-द-कोबर हे नाव दिले.

या साऱ्या  प्रवासा दरम्यान त्याने व्यापारा विषयी माहिती करून घेतली. त्या ठिकाणी अरबांची सोने, चांदी व मसाल्याच्या पदार्थांनी भरलेली चार जहाजे उभी होती. या किनार्यावरून त्याने दोन नाविक घेतले. त्यातील एक नाविक ते सारे ख्रिश्चन असल्याचे समजताच पळून गेला. 

तिथून तो १४ एप्रिलला  केनियाच्या  मालिंदी बेटावर आला. तेथे त्याने भारताच्या कालिकत बंदराची माहिती जाणून घेतली. आणि तो 20 मे  1498 ला कंभारताच्या  पश्चिम  दक्षिण  किनाऱ्यावरील कालिकत  बन्दरामध्ये येऊन पोहचला. 

यावेळी कालिकत बंदर हे सोने चांदी सारख्या महागड्या वस्तूंच्या व्यापारासाठी म्हणून  सर्वत्र प्रसिध्द  होते. खरं सांगायचे म्हटल्यास वास्को-द-गामाने केलेला भारताचा शोध ही  युरोप व्यापारी, सुलतान, लुटारू यांच्या साठी ती एक सोन्याचा देणारी पर्वणीच ठरली.

या दरम्यान येथे त्याने व्यापार केला. येथे कालिकत बंदरामध्ये  तो तीन महिने राहिला.येथील प्रशासना बरोबर काही मतभेद झाल्याने वास्को-द-गामाला भारत सोडावा लागला, जाताना त्याने जहाजे भरून भारतातील संप्पत्ती त्याने पोर्तुगाल मध्ये नेली. 

परतीच्या प्रवासा दरम्यान त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यावेळी त्याच्या जहाजावरील खलाशी आजारी पडू लागले, काहींचा त्यात मृत्यूही  झाला. यावेळी त्याची खलाशी संख्या कमी झाल्याने त्याने सॉओ रैफल जहाजाला तिथेच जाळण्याचे  आदेश दिले. अशाप्रकारे तो पोर्तुगालच्या ट्रैगास नदीवर १० जुलैला पोहचला. तेथून तो  ९ सेप्टेंबरला तो  लिस्बन येथे  पोहचला. 

वास्को-द-गामाची दुसरी समुद्र  यात्रा –

वास्को-द-गामाने  आपल्या  दुसऱ्या समुद्र यात्रेला इ.स. १५०२ मध्ये सुरुवात केली. यावेळी आपल्या सोबत आणखी १० व्यापारी  जहाजांचे  नेतृत्व  केले. १४ जून  १५०२ ला वास्को-द-गामा पूर्व आफ्रिकेच्या सोफला बंदरामध्ये येऊन पोहचला.

त्यानंतर  दक्षिण अरबस्तानला फेरी मारून तो गोव्याला जाऊन पोहचला. यावेळी त्याने कालिकत बंदराच्या उत्तरेस असलेल्या कन्त्रागोर बन्दरामध्ये उभी असलेली अरबांची जहाजे लुटली. या  अरबांच्या जहाजावर किंमती मालाबरोबरच स्त्रिया, लहानमुले, प्रवासी होते या साऱ्यांना जहाजाबरोबर जाळून टाकले. 

वास्को-द-गामाच्या जीवनातील हे भयानक दुष्यकृत्य असल्याचे म्हटले जाते. या नंतर वास्को-द-गामा पुन्हा कालिकत बंदरामध्ये आला. येथे कालिकतच्या राजाबरोबर पोर्तुगालांचे युध्द्व  झाले आणि वास्को-द-गामाला तेथील पराभवामुळे भारत  सोडावा लागला. अशाप्रकारे १५०३ मध्ये वास्को-द-गामा पोर्तुगालला परत आला. त्यानंतर जवळ जवळ २० वर्षांनी  पुन्हा  तो  तिसऱ्या वेळी  भारतात आला. 

वास्को-द-गमाची तिसरी समुद्र यात्रा – 

तिसऱ्या  समुद्र  यात्रे वेळी वास्को-द-गामा हा थेट गोव्याला आला. तेथे व्यापारामध्ये  त्याने बऱ्यापैकी जम बसविला. त्यावेळी गोव्यामध्ये जास्त करून डच, फ्रेंच, पोर्तुगालांचेच साम्राज्य होते. त्यामुळे पोर्तुगाल सरकारने १५२४ म्ध्ये त्यांची व्हाईसराय पदी नियुक्ती केली.

व्हाईसराय झाल्यानंतर तेथील काही अनिष्ठ प्रथाही त्याने बंद केल्या.  भारतीय  समुद्री  प्रवासा दरम्यान त्याने  येथून अनेक मौल्यवान वस्तूंची लूट केली .  पण आज मात्र त्यामुळेच  समुद्रमार्गे व्यापारास चालना मिळाली असे  म्हटल्यास गैर ठरणार नाही.   

वास्को- द-गामाचा मृत्यू  –  

आपल्या तिसऱ्या भारत यात्रेच्या  दरम्यान  वास्को-द-गामाला मलेरिया झाला. ज्याकारणाने त्याचा २४ मे १५२४ मध्ये गोवा येथे मृत्यू  झाला. मृत्यू  पाश्चात  त्याचा मृतदेह पोर्तुगाल येथे नेण्यात आला. त्याने पोर्तुगालच्या लिस्बन येथून  भारताच्या प्रवासाला  सुरुवात केली होती, तेथे त्याचे स्मारक बांधण्यात आले.                                                                                                              

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close