×

टी२० विश्वचषकाचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममधून अनुभवता येणार, पाहा, ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार प्रवेश…

टी२० विश्वचषकाचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममधून अनुभवता येणार, पाहा, ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार प्रवेश…

[ad_1]

आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. यावर्षी विश्वचषकाचे आयोजन भारतामध्यो केले जाणार होते, पण कोरोनाच्या कारणास्तप बीसीसीआयने त्याचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये केले आहे. अशातच चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे.

टी२० विश्वचषकामध्ये ७० % प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. यूएई सरकारने आयसीसी आणि बीसीसीआयला यासाठी परवानगी दिली आहे. स्टेडियममध्ये जाण्यासाठी परवानगी मिळाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आयसीसी सीईओ यांनी मानले आभार

सध्याचे आयसीसी सीईओ जॅक अलार्डिस यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, यूएई सरकारकडून टी२० विश्वचषकासाठी प्रक्षकांना प्रवेश आणि सुरक्षा देण्यासाठी आम्ही आभारी आहोत. आमची इच्छा आहे की स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व १६ देशांच्या चाहत्यांना खेळाचा आनंद घेऊ यावा.

जय शहांनी नियम पाळण्याचे प्रेक्षकांना केले आवाहन

बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही याबाबत त्यांचे म्हणणे मांडले आहे. ते म्हणाले की, “मला आनंद आहे की, टी२० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळला जाईल. चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यासाठी यूएई आणि ओमान सरकारचा आभारी आहे. विश्वचषकाच्या सामन्यांची तिकीट विक्री सुरू झाली आहे. माझी सर्वांना अपील करतो की, ते स्टेडियममध्ये प्रवेशासाठी सर्वप्रकारच्या नियमांचे पालन करतील”

भारताच पहिला सामना २४ ऑक्टोबरला

आगामी टी२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरला होणार असून अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. विश्वचषकातील पहिला सामना ओमान आणि पापुओ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. त्याच दिवशी बांगलादेश आणि स्कॉटलॅंड याच्यातही सामना खेळला जाणार आहे. तसेच सुपर १२ चा पहिला सामना २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होईल. भारत विश्वचषकातील अभियानाची सुरुवात २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल.

[ad_2]

Post Comment